आपला जिल्हा

युवकांच्या पुढाकारातून रक्तदानाचा सेवाभावी उपक्रम – माधवराव देशमुख

मनिष जाधव 9823752964

युवकांच्या पुढाकारातून रक्तदानाचा सेवाभावी उपक्रम – माधवराव देशमुख
सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव मनिष जाधव : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद लोक चळवळ व आदर्श युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जाहिरात
रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती श्री. माधवराव देशमुख साहेब, कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष परागजी संधान , कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिनारदादा कुदळे, माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
अ
ओ
ओ
प्रसिद्ध उद्योगपती माधवराव देशमुख म्हणाले की,  रक्ताची गरज ही कधीही कोणालाही भासू शकते. त्यामुळे रक्तदानाला पर्याय नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याबरोबरच रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही कौतुकाची बाब आहे. युवकांनी सामाजिक जाणीव ठेवून अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. जय हिंद लोक चळवळ व आदर्श युथ क्लबच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी, युवकांची संघटनशक्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची सकारात्मक भावना अधोरेखित झाली. वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
ञ
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,  रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठ सामाजिक कार्यांपैकी एक आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या रक्तदानामुळे जीवनदान मिळू शकते. आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद लोक चळवळ व आदर्श युथ क्लबने रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोपरगावातील युवकांनी अशा विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घ्यावा. आयोजकांचे आणि रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन नगराध्यक्ष पराग संधान यानी केले.
ञ
रक्तदान शिबिरासाठी संजीवनी ब्लड बँकेच्या सौ. नीता पाटील मॅडम, डॉ. जयश्री आढाव, डॉ. रणदिवे, योगिता मगर, दुर्गा पगारे व गजानन राठोड यांनी सहकार्य केले. यावेळी जय हिंद लोक चळवळ व आदर्श युथ क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून गरजू रुग्णाला जीवनदान देणारे कार्य आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच विविध आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर उपलब्ध होणारा रक्तसाठा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगाला सामाजिक उपक्रमाची जोड देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.
यावेळी प्रसिद्ध उद्योगपती राजेशभैय्या ठोळे, औद्योगिक वसाहत संचालक रोहितदादा वाघ, आरोग्य सभापती वैभव आढाव, नगरसेवक डॉ. अमोल अजमेरे, नगरसेवक बाळासाहेब रुईकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, आदर्श युथ क्लबचे संस्थापक मुकुंदजी भुतडा,
राकेश काले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऋषिकेश सांगळे, कैलास भुतडा, विक्रांत रासकर, प्रशांत वाबळे, किशोर गुरसळ, महेंद्र अमृतकर, समीर गवळी, चेतनशेठ खुबानी, प्रमोद मते, वैभव घुले, दिनेश गाडेकर, विजय अमृतकर, विकी जोशी, शुभम गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, अभिषेक गायकवाड, अमोल आढाव, तुषार जोशी, अजय शहा, रवींद्र वाघमारे, राहुल आदमाने, विनायक रत्नपारखी, जनार्दन शिंदे, बंटी गोसावी, सागर लाहोटी, शकीलभाई अत्तार, दर्शन धाडीवाल, डॉ. बंडू शिंदे, सोमनाथ व्यवहारे, शरद कुलकर्णी, सचिन माळवे, निलेश वरोडे, पवन भुतडा, पंकज भुतडा, सौ. पल्लवीभाभी भुतडा, सौ. सारिकाभाभी भुतडा, सौ. रुपालीभाभी भुतडा आदी मान्यवर उपस्थित होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!