आपला जिल्हा

के. जे. सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

मनिष जाधव 9823752964

के. जे. सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालयात व्याख्यान सत्र तर कोपरगाव रेल्वे स्टेशन व गोदावरी नदी पात्र या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. व्याख्यान सत्राच्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मा.संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. बी. एस. गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.

अ

स्वागत मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करतांनाच राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग खऱ्या अर्थाने सामाजिक सद्भावना जपण्याचे काम करत असल्याचे सांगितले. सामाजिक कार्याची ही विचारधारा एकात्मतेचा संदेश देणारी असून महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचली पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात मा.संदीपराव रोहमारे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रनिर्माण, शिस्त आणि श्रमप्रतिष्ठा यांची भावना रुजवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले.

इ

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील गावांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक गावे विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून काही गावांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाल्याचे कौतुक केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. बी. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यपद्धती व विविध उपक्रमांची सखोल माहिती दिली. यावेळी प्रो. डॉ. वसुदेव साळुंके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. संजय दवंगे यांनी केले तर आभार डॉ. दिलीप बागुल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!