Uncategorized

आजपासून पाणीही घेणार नाही मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया 

मनिष जाधव 9823752964

आजपासून पाणीही घेणार नाही मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया 

जालना : जालना येथे मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा प्रश्न फारच चिघळला आहे. राज्यभरात याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे.

मनोज

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही सरकारचं ऐकतोय, प्रतिसाद देतोय, डॉक्टरांचंही ऐकतोय. सरकारने आज निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही. मी आता तसं बोलण्याच्या मूडमध्ये नाही. सरकार शंभर टक्के प्रयत्न करतंय, बैठका घेत आहे. मी आणि माझा समाज सरकारला, डॉक्टरांना प्रतिसाद देणार आहे. शंभर टक्के निकाल लागेल. आज आम्हाला न्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी त्यांना चर्चेचा प्रस्ताव दिला. फडणवीसांनी जरांगे यांना जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी मराठा आरक्षणविषयक कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक पार पडणार असून यामध्ये आरक्षणासंबंधी चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!