आपला जिल्हा

कोपरगावच्या करंजीत सचिन कळमकरांची शेतभेट; ढवळे बंधूंच्या कष्टातून फुलले एक किलोचे ड्रॅगन फ्रूट

मनिष जाधव 9823752964

कोपरगावच्या करंजीत सचिन कळमकरांची शेतभेट

ढवळे बंधूंच्या कष्टातून फुलले एक किलोचे ड्रॅगन फ्रूट

ढवळे बंधूंवर अभिनंदनाचा वर्षाव

कोपरगाव / येवला प्रतिनिधी मनिष जाधव – येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील कळमकर डेअरी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा येवला ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष श्री. सचिन माणिकराव कळमकर यांनी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसह गेल्या अनेक दिवसांपासून दूध व्यवसायाशी जोडलेले दूध उत्पादक शेतकरी तसेच प्रगतशील शेतकरी श्री. संदीप ढवळे व श्री. सतीशजी ढवळे यांच्या शेताला भेट देत त्यांच्या प्रयोगशील शेतीची पाहणी केली. यावेळी ढवळे बंधूंनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक व नाविन्यपूर्ण शेतीची कास धरत उभारलेल्या ड्रॅगन फ्रूट व अद्रक पिकांची उत्कृष्ट लागवड पाहून त्यांच्या मेहनतीचे व प्रयोगशीलतेचे मनापासून कौतुक करण्यात आले.

अ

इ

शेतात पाहणी करताना तब्बल एक किलो वजनाचे ड्रॅगन फ्रूटचे फळ पाहून विशेष कौतुकाची भावना व्यक्त करण्यात आली. मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या हाताला जेव्हा नवा प्रयोग यशाची फळे देतो, तेव्हा तो केवळ शेतमालाचा दर्जा राहत नाही, तर त्यामागील मेहनत, जिद्द आणि दूरदृष्टीची पावती ठरतो. ढवळे बंधूंच्या या प्रयोगातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर आधुनिक शेतीचा प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे.

ई

यावेळी सचिन माणिकराव कळमकर म्हणाले की, ढवळे बंधूंनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत केलेला हा प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी काळानुसार शेतीमध्ये नवे प्रयोग करण्याची गरज आहे. मेहनत, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अभ्यास यांची सांगड घातल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. एक किलो वजनाचे ड्रॅगन फ्रूट हे ढवळे बंधूंच्या कष्टाचे आणि प्रयोगशीलतेचे उत्तम उदाहरण असून, त्यांच्या या प्रयत्नातून इतर शेतकऱ्यांनीही प्रेरणा घ्यावी असे मत देखील यावेळी श्री. सचिन कळमकर यानी व्यक्त केले.

पारंपरिक पिकांपुरते मर्यादित न राहता बदलत्या काळानुसार नवीन पिकांचे प्रयोग करणे आणि त्यासाठी योग्य बाजारपेठेचा विचार करणे आवश्यक आहे. ढवळे बंधूंनी आपल्या कष्टातून व दूरदृष्टीतून शेतीला आधुनिक व्यवसायाची जोड देत परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

औ

यावेळी बाळासाहेब क्षीरसागर, ज्ञानेश्वर मंडाळकर, किरण ढवळे, निखिल ढवळे तसेच परिसरातील उत्कृष्ट व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. श्री. कळमकर यांनी ढवळे बंधूंच्या उल्लेखनीय शेती प्रयोगाचे मनःपूर्वक कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!