भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे यांच्या हस्ते कु. प्राजक्ताताई रविंद्र वाघ व कु. दिव्याताई राजेंद्र वाघ यांचा शैक्षणिक यशाबद्दल सत्कार करण्यात आला.
कु. प्राजक्ताताई रविंद्र वाघ हिने एन.पी.पी. कॉलेज संवत्सर येथे इयत्ता १२ वीमध्ये ७४.३३% गुण मिळवून महाविद्यालयात तिसरा क्रमांक प्राप्त केला. तसेच कु. दिव्याताई राजेंद्र वाघ हिने जनता इंग्लिश स्कूल संवत्सर येथे इयत्ता १० वीमध्ये ८२.६०% गुण मिळवून शाळेत तिसरा क्रमांक पटकावला.


दोघींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पुष्पहार व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी श्री. मुकुंद मामा काळे, श्री. दिनेश नाना बोरनारे, सौ. छायाताई मुकुंदमामा काळे व वाघ परिवार उपस्थित होता.


तसेच कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थाचे चेअरमन श्री. राजेंद्र परजणे साहेब,सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना मा.संचालक श्री.बाळासाहेब शेटे साहेब,संवत्सर ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश भाऊ परजणे,श्री.रामभाऊ कासार साहेब,श्री.संभाजी बोरनारे साहेब,भाजपा सचिव श्री.संदीप भाऊ मैंद,सदस्य मनोज भाऊ शेटे,श्री.राजेंद्र आबा बोरनारे, श्री.मोहन निकम साहेब,श्री.दीलीपराव कासार यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














