Uncategorized

महालक्ष्मी गृहउद्योगाच्या चवदार उत्पादनांना ग्राहकांची पसंती; घरगुती पदार्थांची गुणवत्ता ठरतेय ओळख

मनिष जाधव 9823752964

महालक्ष्मी गृहउद्योगाच्या चवदार उत्पादनांना ग्राहकांची पसंती; घरगुती पदार्थांची गुणवत्ता ठरतेय ओळख

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सध्याच्या धावपळीच्या जीवनात शुद्ध, पौष्टिक आणि घरगुती चवीचे पदार्थ मिळणे कठीण झाले असताना कोपरगाव येथील श्री महालक्ष्मी गृहउद्योग ग्राहकांसाठी दर्जेदार आणि चविष्ट पदार्थ उपलब्ध करून देत आहे. घरगुती पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पापड, कुरडई, वेफर्स आणि इतर खाद्यपदार्थांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ए

गृहउद्योगाच्या माध्यमातून तयार होणारे उडीद पापड, नागली पापड, पालक पापड, बाजरी पापड, बटाटा पापड, टोमॅटो पापड, साबुदाणा वेढुळे, पांढरी वेफर्स, ज्वारी खरवडी तसेच कुरडई यांसारख्या उत्पादनांनी अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. दर्जा, स्वच्छता आणि घरगुती चव यामुळे या उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महिलांच्या स्वावलंबनाला चालना देण्यासोबतच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम प्रोप्रा. पूजा प्रदीप दुसाणे व ऐश्वर्या प्रदीप दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पारंपरिक चव आणि आधुनिक दर्जा यांचा उत्तम संगम साधत हा गृहउद्योग परिसरात विश्वासाचे नाव बनत आहे.

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य दरात उत्कृष्ट दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असून, त्यामुळे कोपरगावसह परिसरातील नागरिकांकडून या गृहउद्योगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

“घरगुती चव, शुद्धतेची हमी आणि गुणवत्तेची खात्री” हे ब्रीद जपत श्री महालक्ष्मी गृहउद्योग ग्राहकांच्या सेवेत सातत्याने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

📍 श्री महालक्ष्मी गृहउद्योग, कोपरगाव, जि. अहिल्यानगर
📞 9673964075 / 9834676913 / 9021232202

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!