सूर्यभान रावजी खेमनर यांना संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उत्कृष्ट टोमॅटो उत्पादक पुरस्कार
सगमनेर प्रतिनिधी – अंभोरे गावचे शेतीनिष्ठ शेतकरी व डॉ.देवेंद्र अमृतलाल ओहरा ज्युनिअर कॉलेजचे अर्थशास्त्र व सहकार विषयाचे प्राध्यापक सूर्यभान रावजी खेमनर यांना संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उत्कृष्ट टोमॅटो उत्पादक पुरस्कार राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब ,पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर व राजहंस दुध संघाचे विद्यमान चेअरमन रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.



प्रा. सूर्यभान खेमनर हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून टोमॅटो उत्पादनात दरवर्षी संगमनेर तालुक्यामध्ये अग्रेसर होते. तसेच सन २०२५-२६ या वर्षांमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये सर्वात जास्त टोमॅटो उत्पादक शेतकरी म्हणून त्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अंभोरे गावचे माजी उपसरपंच लहानू भिमाजी खेमनर, अंभोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन रावजी भागाजी खेमनर, ह. भ. प .नारायणगिरी दूध संस्थेचे व्हा.चेअरमन तुळशीराम, मलगुंडे, अंभोरे गावचे ग्रामस्थ सोपान विठोबा वाघमोडे ,बबन सुभा खेमनर, भाऊसाहेब सावळेराम वाघमोडे, भाऊसाहेब रखमा खेमनर, बाबुराव सखाराम बाचकर,शिवाजी रावसाहेब खेमनर, भाऊसाहेब गुंजाळ पाटील व जुनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य खेमनर के.जी. सर भाऊसाहेब गुंजाळ पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेजचे विद्यमान प्राचार्य खेमनर एस. एम. सर माजी लोकनियुक्त सरपंच भास्करराव खेमनर ,अण्णासाहेब खंडू जगनर आदी मान्यवर उपस्थित होते.













