आपला जिल्हा

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्येच कार्यरत राहणार; प्रतीक पाटील यांचा ठाम निर्णय

मनिष जाधव 9823752964

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्येच कार्यरत राहणार; प्रतीक पाटील यांचा ठाम निर्णय

संघटना बदलण्याचा प्रश्नच नाही; यापुढेही महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनसोबतच काम करणार असल्याची स्पष्ट भूमिका

कोपरगाव मनिष जाधव : अहिल्यानगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्सचे खजिनदार प्रतीक सदानंद पाटील यांनी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्येच कार्यरत राहण्याचा ठाम निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन सोडून अन्य कोणत्याही संघटनेत काम करण्याचा आपला विचार नसून, हा निर्णय अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत आपली भूमिका मांडताना प्रतीक पाटील म्हणाले की, अहिल्यानगर असोसिएशनचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी यापूर्वी आपल्या शब्दावर विश्वास ठेवून दोन ते तीन वेळा संघटनेच्या बदलत्या निर्णयांना साथ दिली. प्रत्येक वेळी आपण दिलेल्या शब्दाला मान देत त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, आता पुन्हा संघटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

य
Oplus_131072

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनशी आपली बांधिलकी कायम असून, यापुढील काळातही याच संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा आपला निर्धार आहे. इतर कोणत्याही संघटनेत सहभागी होण्याची अथवा तेथे काम करण्याची आपली इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझा निर्णय स्पष्ट आणि ठाम आहे. मी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्येच राहून यापुढेही काम करणार आहे. हा माझा अंतिम निर्णय आहे, अशा शब्दांत प्रतीक सदानंद पाटील यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील संघटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!