आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

निर्मला आढाव : सेवा, सहकार्य आणि संवेदनशील नेतृत्वाचे नवे पान

मनिष जाधव 9823752964

 निर्मला आढाव : सेवा, सहकार्य आणि संवेदनशील नेतृत्वाचे नवे पान

आढाव
Oplus_16908288

प्र. १ : प्रभाग क्रमांक ०३ बद्दल तुमची भूमिका काय आहे?

उत्तर – प्रभाग ०३ हा माझा केवळ कार्यक्षेत्र नाही, तर माझा विश्वास, माझी नाळ आणि माझ्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा आहे. या प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा, गरजा आणि सुरक्षित भविष्याला प्राधान्य देणे हीच माझी भूमिका आहे.

प्र. २ : तुमचा अनुभव प्रभागाच्या विकासाला कसा उपयोगी ठरेल?

उत्तर – मी, निर्मला सोमनाथ आढाव, गेली १५ वर्षे माझे पती सोमनाथ आढाव यांच्या विशेष मदतीने तसेच शिव तांडव प्रतिष्ठान च्या माध्यमातून गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासह सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि महिला-बालविकास अशा विविध क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सातत्याने आघाडीवर आहे. लोकांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्या सोडविण्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आहे. हा दीर्घ अनुभव प्रभागातील विकासकामांना दिशा, वेग आणि विश्वास देईल.

प्र. ३ : प्रभागातील महिलांसाठी तुमची भूमिका काय असेल?

उत्तर- महिला स्वावलंबन, आरोग्य, सुरक्षितता आणि त्यांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे हे माझे मुख्य ध्येय आहे. महिलांसाठी कौशल्य विकास, मार्गदर्शन, समिती उपक्रम आणि सहाय्य योजनांवर विशेष भर देईन.

प्र. ४ : युवकांसाठी कोणत्या संधी निर्माण करणार?

उत्तर- रोजगाराभिमुख कार्यक्रम, क्रीडा साहित्य, करिअर मार्गदर्शन, डिजिटल प्रशिक्षण आणि युवकांना पुढे घेऊन जाणारे उपक्रम सुरू करून प्रभागातील तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल.

प्र. ५ : तुमचे प्राधान्यक्रम कोणते?

उत्तर –
√ पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, रस्ते आणि स्ट्रीटलाईट यांसारख्या मूलभूत सुविधांचे उन्नतीकरण

√ महिलांसाठी सुरक्षा व स्वावलंबनाच्या योजना

√ युवकांसाठी कौशल्य व विकास कार्यक्रम

√ ज्येष्ठांसाठी आरोग्य सेवा आणि सहाय्य नागरिकांसोबत सतत संवाद आणि पारदर्शक कार्यपद्धती

प्र. ६ : प्रभाग ०३ च्या विकासासाठी तुमची दृष्टी काय आहे?

उत्तर- आमदार आशुतोष काळे व मार्गदर्शक काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाला आधुनिक, सुव्यवस्थित, सुरक्षित आणि सुविधा-संपन्न बनवणे. प्रत्येक घराशी जोडलेली सेवा आणि विश्वास हीच माझ्या कार्याची ओळख असेल.

अ
काका कोयटे

प्र. ७ : नागरिकांनी तसेच मतदारांनी तुम्हाला का साथ द्यावी?

उत्तर- कारण मी गेली १५ वर्षे समाजातील प्रत्येक घटकासाठी माझे पती सोमनाथ आढाव यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली सतत काम केले आहे, कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा दिली आहे, आणि आजही ‘सेवा हाच धर्म’ या भावनेतूनच उमेदवारी स्वीकारली आहे. माझा अनुभव, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख दृष्टीकोन प्रभाग ०३ ला निश्चितच नवी दिशा देईल.

ऊ
Oplus_16908288

प्र. ८ : समस्यांचे निराकरण करताना तुम्हाला कोणाचे सहकार्य लाभले?

उत्तर – प्रभागातील विविध सामाजिक, नागरी आणि व्यक्तिगत समस्या सोडविताना मला आमदार आशुतोष काळे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन सतत मिळाले. त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे प्रभागातील अनेक प्रश्नांना गतीने उपाय मिळाले. तसेच, माझे पती सोमनाथ आढाव यांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेले भक्कम साथ–पाठबळ हे माझ्यासाठी मोठे बळ ठरले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी समाजकार्य अधिक प्रभावीपणे करू शकले आणि आज प्रभागाच्या सेवेसाठी उभी राहू शकते.

प्र. १० : तुम्ही नवीन असलात तरी प्रभागातील प्रश्न सोडविताना तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन लाभणार आहे?

उत्तर- मी उमेदवारीत नवीन असले तरी प्रभागातील समस्या सोडविण्याच्या कामात मी एकटी नाही. मला प्रभागातील अनुभवी नेतृत्वाची प्रभावी साथ मिळत आहे. प्रभागात अनेक वर्षे काम केलेले जनार्दन सुधाकर कदम यांचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या प्रशासकीय समन्वयाची क्षमता, लोकांशी असलेला संवाद आणि समस्या हाताळण्याची कार्यक्षम पद्धत यामुळे मला प्रश्न सोडविताना योग्य दिशा मिळेल. तसेच, प्रभागासाठी कायम सक्रिय राहिलेले काकासाहेब कोयटे यांचे सहाय्य, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहभाग हे माझ्या कार्याला अधिक बळ देणार आहे.

औओ

प्र. ११ : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही कोणती ठोस व्यवस्था करणार आहात?

उत्तर- प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी मी सदैव उपलब्ध राहणे ही माझी प्राथमिकता आहे. म्हणूनच, प्रभागात एक कायमस्वरूपी ‘संपर्क कार्यालय’ सुरू करण्यात येईल, जेथे नागरिकांना त्यांचे प्रश्न, सूचना आणि तक्रारी नोंदविण्यासाठी सहजपणे भेट देता येईल.

याशिवाय, कामकाजाची पारदर्शकता राखण्यासाठी आणि प्रगतीचे नियमित मूल्यमापन करण्यासाठी दर आठवड्याला एक ‘प्रभाग आढावा बैठक’ आयोजित केली जाईल. या बैठकीत सुरू असलेल्या कामांची माहिती, प्रलंबित प्रश्न, आणि पुढील उपाययोजना निश्चित केल्या जातील. ही सातत्यपूर्ण संवादप्रक्रिया आणि नियोजनबद्ध पद्धत प्रभागातील समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. अनुभवाची साथ आणि नव्या ऊर्जेची जोड अशी ही टीम प्रभाग ०३ च्या विकासाला नक्कीच नवी गती देईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कोयटे ओमप्रकाश दादाप्पा तसेच नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आढाव निर्मला सोमनाथ व कदम जनार्दन सुधाकर यांना ” घड्याळ” या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!