आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

फडणवीसांच्या सभेचा प्रभाव स्पष्ट; प्रभाग २ मध्ये राहुल खरात–स्वाती जपे आघाडीवर

मनिष जाधव 9823752964

फडणवीसांच्या सभेचा प्रभाव स्पष्ट; प्रभाग २ मध्ये राहुल खरातस्वाती जपे आघाडीवर

Qw

कोपरगाव मनिष जाधव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावात केलेल्या प्रभावी जाहीर सभेने शहरासह प्रभाग क्रमांक २ मधील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम घडवून आणला आहे. विकासकामांची ठोस मांडणी, भावनिक आवाहन आणि पुढील काळातील कोपरगावच्या सर्वांगीण प्रगतीबाबत दिलेल्या हमीमुळे प्रभाग २ मध्ये उमेदवार राहुल खरात आणि स्वाती जपे या उमेदवारांचे वातावरण चांगले वातावरण तयार झाले आहेत.

ऊ
Oplus_16908288

सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने भाजप व मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना नव्या उर्जेची चालना मिळाली असून स्थानिक मतदारसंघात त्यांच्या बाजूने स्पष्ट लाट निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील प्रलंबित प्रकल्प, निधी वितरण आणि नव्या विकास आराखड्याचा विशेष उल्लेख करत शहरासह प्रभाग २ च्या नागरिकांपर्यंत विश्वासाचे ठोस संदेश पोहोचवले.

Q
Oplus_16908288
Q
Oplus_16908288

यामुळे प्रभाग २ मधील घराघरात चर्चेची हवा चांगलीच झाल्याने उमेदवारांच्या प्रचाराला अधिक वेग, विश्वास आणि सकारात्मकतेची नवी दिशा मिळाल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय चांगलाच तयार झाला आहे‌. फडणवीसांच्या सभेचा प्रभाव इतका ठळक राहिला की प्रभाग २ मधील उमेदवारांच्या विजयाची शक्यता आता अधिक मजबूत होत असल्याचे प्रचारातुन समोर आले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!