आपला जिल्हा

डीबीटी स्टार टास्क फोर्स समन्वयकांच्या ७ व्या आढावा बैठकीचा सोमैया महाविद्यालयात दिमाखदार प्रारंभ.

मनिष जाधव 9823752964

 डीबीटी स्टार टास्क फोर्स समन्वयकांच्या ७ व्या आढावा बैठकीचा सोमैया महाविद्यालयात दिमाखदार प्रारंभ..

कोपरगाव मनिष जाधव – : १९८० मध्ये स्टार कॉलेज योजनेच्या स्थापनेवेळी विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात रुची वाढविणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा उद्देश होता. प्रयोगशाळांचा विकास व सुधारणा करणे, शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे जेणेकरून समाजाला त्याचा अधिक फायदा होईल. एकूणच विज्ञान शिक्षणाच्या संस्कृतीमध्ये बदल घडवून आणणे हा या योजनेच्या स्थापने मागील उद्देश होता. उच्च शिक्षणामध्ये सध्या नवीन प्रवाह येत आहेत. प्रयोगशाळेतील वैज्ञानिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे, ते अधिक गुणवत्तापूर्ण कसे होईल हे पाहणे, अध्ययन-अध्यापनामध्ये ‘एआय’ चा वापर करणे आणि अशा बदलत्या काळात स्वतःमध्येही बदल करणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवणेही गरजेचे आहे”, असे प्रतिपादन टास्क फोर्स चे अध्यक्ष प्रोफेसर सुरेश गर्ग यांनी येथे केले. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डी.बी.टी. स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत अनुदान प्राप्त महाविद्यालये व टास्क फोर्सच्या ७ व्या तीन दिवसीय आढावा बैठकीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रोफेसर सुरेश गर्ग बोलत होते. अध्यक्षस्थानी को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. या प्रसंगी स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्ष डॉ. पी. हेमलता रेड्डी यांची प्रमुख उपस्थित होती.

इ
देशभरातून आलेल्या संशोधक व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना प्रोफसर डॉ. सुरेश गर्ग

याप्रसंगी डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्रामच्या प्रमुख आणि प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.गरिमा गुप्ता व या प्रोग्रामचे सल्लागार प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. धनंजय तिवारी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित संशोधक, प्राध्यापक व शिक्षणप्रेमी नागरिकांना शुभेच्छा देताना साई बाबांच्या भूमीमध्ये ही आढावा बैठक असल्याने विशेष आनंद झाला असल्याचे सांगितले.

उद्घाटन सत्राच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, ” केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डी.बी.टी.स्टार कॉलेज प्रोग्राम विभागाने आमच्या महाविद्यालयाला ७ व्या आढावा बैठकीसाठी यजमान म्हणून आमच्या महाविद्यालयाची निवड केली त्याबद्दल धन्यवाद देतो. १९६४ मध्ये स्थापन झालेले आमचे महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्षेत्रातील एक नामवंत महाविद्यालय असून गेल्या ६२ वर्षांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. आज येथे ७ संशोधन केंद्रे आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर विभागात संशोधन सुरू आहे. महाविद्यालयाच्या आणि विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी येथे सातत्याने प्रयत्न केले जातात. आम्ही विज्ञान शाखेच्या आणि विशेषत: ए.आय.एम.एल. व डेटा सायन्स विषयांच्यादेखील सुसज्ज प्रयोगशाळा उभारल्या आहेत. भविष्यात देखील आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू.”

को.ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड संजीव कुलकर्णी व कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे यांनी देशभरातून या आढावा बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व संशोधक, प्राचार्य व प्राध्यापकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या आढावा बैठकीचे समन्वयक डॉ. शंकरय्या कोंडा यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या सोहळ्यास देशभरातून अनेक महाविद्यालयांचे डी.बी.टी.स्टार समन्वयक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर वर्गांचे विद्यार्थी, संशोधक आणि बहुसंख्य प्राध्यापक देखील उपस्थित होते. डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. वर्षा आहेर यांनी या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!