एस.एस.जी.एम. कॉलेजमधील प्रा. सुभाष सैंदनशिव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न
(प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल गौरव; सहकारी व मान्यवरांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा)
कोपरगाव, दि. १ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान, गौतम कला व संजीवनी वाणिज्य महाविद्यालय (एस.एस.जी.एम. कॉलेज), कोपरगाव येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुभाष सैंदनशिव हे नियत वयोमानानुसार दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनिमित्त महाविद्यालयात सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ होते. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. घनश्याम भगत यांनी प्रा. सैंदनशिव यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाचे कौतुक केले.

अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. निलेश मालपुरे यांनी मनोगत व्यक्त करून प्रा. सैंदनशिव यांच्या सेवाभावी वृत्तीचा, कर्तव्यनिष्ठेचा आणि महाविद्यालयीन कामकाजातील योगदानाचा गौरव केला. प्रा. मोहनसिंग पाडवी, डॉ. विलास गाडे व योगेश खिल्लारी यांनीही मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी प्रा. सैंदनशिव यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाचे कौतुक केले. संस्थेच्या कार्यात प्रामाणिकपणे व सातत्याने योगदान देणाऱ्या सेवकांचा सन्मान करणे ही संस्थेची कृतज्ञता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. सैंदनशिव यांनी सेवाकाळात जपलेली कर्तव्यनिष्ठा, सहकार्याची भावना आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे त्यांनी कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, सर्व विज्ञान शाखेतील विभागप्रमुख, प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदी उपस्थित होते . सेवक कल्याण मंडळातील सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले. सहकाऱ्यांनी प्रा. सैंदनशिव यांच्याप्रती असलेल्या स्नेहभावना व्यक्त करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.सेवक कल्याण मंडळातील सहकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. नामदेव आडमुठे यांनी मानले.














