नाशिक

येवलाकरांसाठी आनंदाची बातमी! पालखेडचे आवर्तन गंगासागर साठवण तलावात दाखल

मनिष जाधव 9823752964

येवलाकरांसाठी आनंदाची बातमी! पालखेडचे आवर्तन गंगासागर साठवण तलावात दाखल

नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते गंगापूजन; मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांनी दिलेला शब्द पाळला

येवला प्रतिनिधी – येवला शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून पालखेड धरणाचे आवर्तन येवला शहराच्या गंगासागर साठवण तलावात दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर येवला नगरपरिषदेचे माननीय नगराध्यक्ष श्री. राजेंद्र भाऊलाल लोणारी यांच्या हस्ते विधिवत गंगापूजन करण्यात आले.

पालखेड

येवला शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली असताना नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पालखेडच्या आवर्तनाची मागणी करण्यात येत होती. याच अनुषंगाने राज्याचे माननीय मंत्री श्री. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी २५ तारखेला पालखेडचे आवर्तन सोडण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळत येवलाकरांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालखेडचे पाणी गंगासागर साठवण तलावात दाखल झाल्यानंतर नगराध्यक्ष श्री. राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते गंगापूजन करून पाण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब तसेच समीर भुजबळ यांचे येवला शहराच्या वतीने विशेष आभार मानले. तसेच मुख्याधिकारी तुषार आहेर यांचे देखील आभार मानले येवलाकरांच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन वेळेवर आवर्तन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी नागरिकांना पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. तलावात पाणी दाखल झाले असले तरी पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करत येवलाकरांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.
यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष पुष्पाताई गायकवाड नगरसेविका छायाताई क्षीरसागर गटनेते दीपक लोणारी नगरसेवक सुनील अण्णा जाधव अमजद भाई शेख जावेद भाई लखपती कुणाल परदेशी माजी नगराध्यक्ष बंडू शिरसागर यतीभाई गुजराती बांधकाम अभियंता गणेश अंदुरे नितीन आहेर आदि. उपस्थित

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!