आपला जिल्हा

गर्जे ई.एन.टी. अँड चाईल्ड केअरच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी

मनिष जाधव 9823752964

आ

गर्जे ई.एन.टी. अँड चाईल्ड केअरच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते होणार लोकार्पण

डॉ. अजेय गर्जे यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आणि वेळोवेळी मदत केलेल्या लाखो रुग्णांचे पालक व नातेवाईक यांना मनःपूर्वक विनंती आहे की, आपणास प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देणे अपेक्षित होते; मात्र प्रकृती व वेळेअभावी ते शक्य झाले नाही. त्यामुळे हेच निमंत्रण प्रत्यक्ष भेट समजून अगत्याने उपस्थित राहावे. पुढील पिढीला आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊन आम्हांस उपकृत करावे, ही नम्र विनंती.

डॉ. अजेय गर्जे, कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – : कोपरगाव शहरातील गर्जे हॉस्पिटलच्या नूतनीकृत वास्तूमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या ‘गर्जे ई.एन.टी. अँड चाईल्ड केअर’ या नव्या आरोग्यसेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता राम मंदिर रोड, कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. बालरुग्णसेवेची ३५ वर्षांची परंपरा जपत आता कान-नाक-घसा (ENT) विभागासह अधिक व्यापक आणि अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा गर्जे परिवाराचा मानस आहे.

औ
Oplus_131072

गर्जे हॉस्पिटलने गेल्या ३५ वर्षांपासून बालरुग्णांच्या सेवेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर उपचार करताना विश्वासार्हता, सेवाभाव आणि तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन यामुळे या रुग्णालयाने परिसरातील नागरिकांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. याच आरोग्यसेवेच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत आता ‘गर्जे ई.एन.टी. अँड चाईल्ड केअर’ या नावाने नव्या स्वरूपात आरोग्यसेवा सुरू करण्यात येत आहे.

या लोकार्पण सोहळ्याच्या शुभहस्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे लाभणार आहे. डॉ. लहाने हे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ असून मुंबई येथील जे.जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता म्हणून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अ
Oplus_131072

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोषदादा काळे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य विवेकभैय्या कोल्हे उपस्थित राहणार आहेत. तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशभाऊ परजणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

नव्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विशेषतः बालरोग तसेच कान, नाक व घशाशी संबंधित आजारांसाठी एकाच ठिकाणी तज्ज्ञ सेवा मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या आरोग्य केंद्रात डॉ. अजय चंद्रकांत गर्जे (MD, Ped.) बालरोग तज्ज्ञ, डॉ. पूजा वरद गर्जे (MBBS, MS ENT) – ई.एन.टी. तज्ज्ञ व एन्डोस्कोपिक सर्जन तसेच डॉ. वरद अजय गर्जे (MBBS, DCH) – बालरोग तज्ज्ञ यांच्या माध्यमातून रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे.

कोपरगाव तसेच परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गर्जे परिवाराने उचललेले हे पाऊल आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. विशेषतः बालरुग्णांसाठी प्रदीर्घ काळ सेवा देणाऱ्या गर्जे हॉस्पिटलच्या या नव्या विस्तारामुळे रुग्णांना अधिक सुविधा आणि तज्ज्ञ उपचारांची उपलब्धता होणार आहे.

रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता, गर्जे ई.एन.टी. अँड चाईल्ड केअर, राम मंदिर रोड, कोपरगाव** येथे होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गर्जे परिवाराच्या या नव्या आरोग्यसेवा उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन गर्जे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!