आपला जिल्हा

सहकार क्षेत्रामध्ये महिलांचे मोठे योगदान – वैशाली आवाडे 

मनिष जाधव 9823752964

शिर्डीत राज्यस्तरीय  भव्य नारीशक्ती सहकारिता संमेलन

 सहकार क्षेत्रामध्ये महिलांचे मोठे योगदान – वैशाली आवाडे 

वैशाली आवाडे

 दोन दिवसीय संमेलनामधील विषय
👉 भारतातील सहकार आणि महिलांची भूमिका
👉 सहकारातून महिला सक्षमीकरण
👉 सहकारातून समृद्ध भारत या संकल्पनेत महिलांचे योगदान
👉 विकसित भारत २०४७ मध्ये महिला सहकाराची भूमिका
👉 महिला नेतृत्व आणि सहकारी प्रशासन
👉 सहकारी संस्थांमध्ये महिलांचे नेतृत्व, संचालक मंडळातील प्रभावी भूमिका व निर्णयप्रक्रियेत सहभाग
👉 कृषी सहकार, महिला शेतकरी, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO)
👉 महिला बचत गट ते सशक्त सहकारी संस्था (SHG ते Cooperative) यशस्वी मॉडेल्स
👉 सहकार आणि महिला उद्योजकता, महिला उद्योजकांसाठी विशेष वित्तपुरवठा योजनांची आवश्यकता
👉 युवा महिलांसाठी सहकारातील करिअर संधी
👉 यशोगाथा.. विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचे अनुभव
शिर्डी प्रतिनिधी मनिष जाधव– महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये महिलांचे खूप मोठे योगदान आहे. अनेक महिला सहकारी संस्था महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तमपणे कार्य करीत आहेत. अनेक प्रकारच्या सहकारी संस्थांचे अध्यक्षपद सुद्धा आता महिला भूषवित आहेत. त्यामुळे या क्षेत्राला अधिक चालना देण्याच्या उद्देशाने व हे क्षेत्र अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने शिर्डी येथे  सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यस्तरीय नारीशक्ती महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहकार भारती चे महिला प्रमुख वैशाली आवाडे यांनी दैनिक जनसंजीवनी शी बोलताना दिली. यावेळी सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष दत्ताराम चाळके, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. विवेक जुगादे, सहकार भारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रविकाका बोरावके, प्रदेश सचिव नकुल कडू, प्रदेश कार्यालय प्रमुख  श्रीकांत पटवर्धन, प्रदेश सहकोषाध्यक्ष औदुंबर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
उ
Oplus_131072
महिला प्रमुख वैशाली आवाडे पुढे बोलताना म्हणाले की, सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, त्या प्रशिक्षित व्हाव्यात व येणाऱ्या  काळात सहकारी संस्थांमध्ये त्यांचे सक्षम नेतृत्व निर्माण होण्याच्या उद्देशाने या संमेलनात विविध विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन सुद्धा उपस्थित महिलांना दोन दिवसांच्या विविध सत्रांमध्ये होणार आहे. आयोजित केलेल्या संमेलनाला राज्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बाल कल्याण विकास मंत्री सौ. मेघना बोर्डीकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. विजयाताई रहाटकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. संजय पाचपोर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या संमेलनामध्ये सहकार क्षेत्रात कार्यरत विविध सहकारी संस्थांच्या २ हजाराहून अधिक महिला प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे वैशाली आवाडे यांनी सांगितले.
झ
Oplus_131072
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यानी माहिती देताना सागितले की, अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सहकार भारतीचा दबदबा वाढला आहे. सहकार क्षेत्रात चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर सहकार भारतीचे नाव आज संपूर्ण सहकार क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. सहकार भारतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हजारो कार्यकर्ते निःस्वार्थ भावनेने काम करत असून या क्षेत्रात संस्कार आणण्याचे मोलाचे कार्य सहकार भारती मागील अनेक वर्षांपासून करीत आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सहकार भारतीने मागील अनेक वर्षांपासून सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. आणि म्हणूनच या क्षेत्रावरचा विश्वास हा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्याचे दत्ताराम चाळके म्हणाले.

औओ

सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. विवेक जुगादे यांनी सांगितले की, सन् २०२१ मध्ये केंद्रात सहकाराचे स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर या क्षेत्राला आता अधिक ऊर्जा मिळत आहे. देशभरातील ६.५० लाख सहकारी संस्थापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये २.५० लाखाहून अधिक सहकारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील १३ कोटींपैकी लोकसंख्येच्या ८ कोटींच्यावर लोक सहकाराची जोडल्या गेले आहेत. आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाला अधिक वाव मिळण्याच्या अनुषंगाने सहकार भारतीने हे भव्य दिव्य संमेलन शिर्डी येथे आयोजित केले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून महिलांमध्ये सहकार क्षेत्राविषयी अधिक जागरूकता निर्माण करून येणार्या काळात त्यांचे नेतृत्व विकसित करणे हाच या संमेलनामागचा मूळ हेतू आहे. पुढील वर्षी सहकार भारती सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या सुवर्ण महोत्सवी काळामध्ये महिलांच्या नेतृत्वास अधिक वाव मिळावा या दृष्टीने संघटना प्रयत्नशील आहे. निश्चितपणे या संमेलनाच्या माध्यमातून हजारो महिलांचे नवे नेतृत्व या सहकार क्षेत्राला मिळेल अशी आशा विवेक जुगादे यांनी व्यक्त केली.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!