आपला जिल्हा

कर्तव्यनिष्ठ फार्मासिस्ट घडविणे ही काळाची गरज – औषध निरीक्षक सोमनाथ मुळे

मनीष जाधव ९८२३७५२९६४

कर्तव्यनिष्ठ फार्मासिस्ट घडविणे ही काळाची गरज – औषध निरीक्षक सोमनाथ मुळे

आर जे एस फार्मसी कॉलेज कोकमठाण तर्फे फार्मासिस्ट दिनानिमित्त १५ फार्मासिस्टांचा सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी मनीष जाधव – समाजाच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडताना प्रत्येक फार्मासिस्टने आपले कार्य प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने करणे आवश्यक आहे. फार्मसी हा केवळ पैसे कमावण्याचा व्यवसाय नसून लोकांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाचे सेवाक्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहून जबाबदारीची जाणीव ठेवत फार्मसी व्यवसायातील नैतिक मूल्ये अंगीकारावीत,असे प्रतिपादन, अहिल्यानगरचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांनी केले.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण येथे निरोगी भविष्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरणया संकल्पनेअंतर्गत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सोमनाथ मुळे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते.यावेळी सोमनाथ मुळे यांनी विद्यार्थ्यांना गरुडाच्या भरारीचे उदाहरण देत जीवनात मोठी ध्येये ठेवण्याचा संदेश दिला.गरुडाची आई आपल्या पिल्लाला उंच आकाशात भरारी घेण्यास शिकवते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहून आपल्या जीवनात यशाची भरारी घ्यावी.असे त्यांनी सांगितले.
W
यावेळी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा माऊली फार्माचे संचालक गणेश वाणी यांनी संत जनार्दन स्वामी यांच्या सेवाभावी कार्याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जनार्दन स्वामींनी आयुष्यभर ‘देणे’ हेच आपले व्रत मानून समाजसेवा केली.त्याचप्रमाणे आर जे एस मधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने समाजसेवेची भावना मनात ठेवून कर्तव्यनिष्ठ व सेवाभावी फार्मासिस्ट बनावे,असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष चांगदेवरावजी कातकडे,अहिल्यानगरचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे, कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी, प्रसिद्ध उद्योजक मा.विजय कडू,प्राचार्य डॉ. नितीन जैन व उपप्राचार्या डॉ.उषा जैन यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्राचार्य डॉ. नितीन जैन यांनी फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, फार्मासिस्ट दिन हा आरोग्यसेवेत फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी फाॉर्मसी
व्यवसायातील प्रामाणिकपणा, नैतिकता, सेवाभाव, व्यसनमुक्त जीवन आणि समाजाच्या आरोग्याप्रती असलेली जबाबदारी अंगीकारणे आवश्यक आहे.
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. आर जे एस फाउंडेशनचे अध्यक्ष मा. चांगदेव कातकडे यांच्या हस्ते सुहास भागवत लाटे व छाया सुहास लाटे या दाम्पत्यास“जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच अनुप अरुण डागा व रिना अनुप डागा या दाम्पत्यास फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बेस्ट फार्मासिस्ट अवार्ड प्रदान करून गौरविण्यात आले.यासोबतच कोपरगाव तालुक्यात फार्मसी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ फार्मासिस्टांचा विशेष सत्कार करण्यात आला. या पुरस्कार व सत्काराच्या माध्यमातून फार्मसी क्षेत्रातील सेवाभाव, समर्पण आणि समाजाच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसादजी कातकडे, उद्योजक विजय कडू, इंजिनिअर मा. दीपक कोटमे व मा. प्रणित कातकडे यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सर्व फार्मासिस्ट, शिक्षक, विद्यार्थी व फार्मसी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. फार्मासिस्ट हा आरोग्यसेवेतील महत्त्वाचा घटक असून, समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या मूल्यांच्या आधारे भविष्यात कर्तव्यनिष्ठ फार्मासिस्ट म्हणून कार्य करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्रा. सोनाली कोते, प्रा. पूजा जाधव, प्रा. वैभव गाढवे, प्रा. डॉ. विजय जाधव, प्रा. डॉ. सचिन आगलावे, प्रा. डॉ. सुवर्णा थोरात, प्रा. सचिन चव्हाण, प्रा. उत्कर्ष लासुर, प्रा. कावेरी चौधरी, प्रा. प्राची सोमवंशी, प्रा. वैष्णवी लोखंडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जागतिक फार्मासिस्ट दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!