उद्या प्रभाग क्र. ६ मध्ये विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपा–लोकसेवा आघाडीची प्रचार रॅली
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, लोकसेवा आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भव्य प्रचार नारळ पूजन व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सराफ बाजार परिसरातील महादेव मंदिरापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे.

भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. पराग शिवाजी संधान (कमळ), प्रभाग क्र. ६ मधील लोकसेवा आघाडी (चिन्ह – छत्री) उमेदवार श्रीमती पद्मावती योगेश बागुल(छत्री) तसेच श्री. विक्रमादित्य संजय सातभाई (छत्री) यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.


या प्रचार रॅलीस युवा नेते विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे यांच्या विशेष उपस्थिती लाभणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपल्या परिवार व मतदारांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकारी यांचा वतीने करण्यात आले आहे.














