शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा संपन्न
राहाता प्रतिनिधी मनिष जाधव – राहाता येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये संकुलाच्या ज्युनिअर कॉलेज विभागाच्या वतीने पाळसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होणे, शिस्त, संयम, सहनशीलता इत्यादी गुण विकसित होणे ,विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला महत्त्व देणे व खिलाडू वृत्ती वाढीस लागणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धेसाठी या आंतरशालेय स्पर्धेतून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे . कबड्डी, खो-खो ,हॉलीबॉल इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले.


मुलांच्या संघाप्रमाणेच मुलींच्याही बऱ्याच संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे, प्राचार्या शिला संसारे, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे, प्र.उपप्राचार्य जगताप एस.पी.यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक सुनील बनसोडे यांनी उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धेचे नियोजन केलेले आहे. सदर प्रसंगी प्रा. शरद गमे, प्रा. बाळासाहेब दिघे ,प्रा. रमेश आहेर, प्रा. मोसीन शेख ,प्रा. सिंधू तनपुरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण दिसून आले.













