Uncategorized

राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन; कार्यकारी अध्यक्ष (वर्किंग प्रेसिडेंट) पदी काका कोयटे यांची एकमताने निवड

सपादक मनिष जाधव 9823752964

राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन; कार्यकारी अध्यक्ष (वर्किंग प्रेसिडेंट) पदी काका कोयटे यांची एकमताने निवड

कोपरगाव मनिष जाधध – महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष पदी रत्नागिरी येथील श्री स्वामी स्वरूपानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांची , तर अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची कार्यकारी अध्यक्ष (वर्किंग प्रेसिडेंट) पदी एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक वासुदेव काळे यांनी दिली.

अ
Oplus_131072

पुणे येथे १२ जून २०२६ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काका
Oplus_131072

बैठकीदरम्यान राज्यभरातील संचालकांनी काका कोयटे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत त्यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारावी, अशी आग्रही विनंती केली. मात्र वाढते वय, संस्थात्मक जबाबदाऱ्या, शैक्षणिक उपक्रम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज यांचा उल्लेख करत कोयटे यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास विनम्र नकार दिला.

यानंतर सर्वानुमते दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली. निवडीनंतर पटवर्धन यांनी स्वतः पुढाकार घेत काका कोयटे यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून संघटनेत सक्रिय राहावे, अशी विनंती केली. संचालक मंडळाने या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा देत कोयटे यांची कार्यकारी अध्यक्ष (वर्किंग प्रेसिडेंट) पदी निवड केली.

विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी यवतमाळचे राजूदास जाधव, नाशिकच्या ॲड. अंजलीताई पाटील, साताऱ्याचे डॉ. रवींद्र भोसले आणि सांगलीचे शशिकांत राजोबा हे इच्छुक होते. मात्र सहकार चळवळीच्या व्यापक हितासाठी सर्वांनी माघार घेत दीपक पटवर्धन यांच्या निवडीला एकमताने मान्यता दिली.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले, “काका कोयटे यांचा पतसंस्था चळवळीतील प्रदीर्घ अनुभव, राज्यभरातील व्यापक संपर्क आणि पतसंस्थांमधील लोकप्रियता लक्षात घेता त्यांचे मार्गदर्शन राज्य फेडरेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकारी अध्यक्ष (वर्किंग प्रेसिडेंट) म्हणून कार्यरत राहण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्वही कायम ठेवावे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.”

दीपक पटवर्धन हे गेल्या १५ वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महामंडळाचेही दीर्घकाळ संचालक राहिले आहेत. रत्नागिरीतील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या नगर वाचनालयाचे आणि श्री स्वामी स्वरूपानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच रत्नागिरी जिल्हा भाजपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली असून सहकार क्षेत्रातील कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे.

तसेच काका कोयटे हे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक सदस्य असून सहसचिव, महासचिव तसेच डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क लक्षात घेता पतसंस्था चळवळीसाठी त्यांचे योगदान आजही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत संचालकांनी व्यक्त केले.

कायद्याचे सखोल ज्ञान असलेले दीपक पटवर्धन आणि प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत राहून चळवळ उभारणारे काका कोयटे यांची जोडी राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सर्व संचालकांची मते जाणून घेत पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

काका कोयटे यांनी काही प्रमाणात का होईना राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीची जबाबदारी स्वीकारल्यामुळे राज्यभरातील सहकारी पतसंस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, नेतृत्व आणि मार्गदर्शन यांचा लाभ पुढेही चळवळीला मिळणार असल्याने पतसंस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर कायदेतज्ज्ञ दीपक पटवर्धन आणि अनुभवी सहकार नेते काका कोयटे यांची जोडी राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!