Uncategorized

आरोग्य समिती आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक  इम्तियाज अत्तार यांच्या विविध सूचना

सपादक मनिष जाधव 9823752964

आरोग्य समिती आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांच्या विविध सूचना

कोपरगाव प्रतिनिधी – आगामी पावसाळ्याच्या धर्तीवर आणि शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सोमवार (दि.१५) रोजी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत आ.आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी विविध सूचना मांडल्या.
ऊ
येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्यामुळे शहरात डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शहरातील सर्वच प्रभागांमधील कचरा वेळेवर उचलून प्रभाग स्वच्छ ठेवून शहरात नियमितपणे डास प्रतिबंधक औषध फवारणी तसेच धूर फवारणी करावी. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे उद्घाटन होवून बराच कालावधी उलटला आहे तरी हि हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. तरी तातडीने हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. तसेच संपूर्ण शहरात अनेक जुनी झाडे असून उन्हाची दाहकता वाढत असल्याने लांबलेल्या पावसाची वाट न पाहता या झाडांना नियमित पाणी देण्याची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे.
शहरातील सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक शौचालयांमध्ये पाणी नाही तर काही शौचालयांची दारे तुटलेल्या स्थितीत असल्याने नागरिकांची विशेष करून महिलांची गैरसोय होत आहे. यामुळे शहरातील सर्व शौचालयांची दुरुस्ती आणि पाण्याची सुविधा करून नियमित स्वच्छ करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. पालिका सत्ताधारी आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. यामुळे सुचवलेल्या आणि ठरलेल्या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी. अशा विविध प्रकारच्या नागरिकांच्या हिताच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत मांडल्या
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!