आपला जिल्हा

येवला शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम

मनिष जाधव 9823752964

येवला शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम
नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई; विंचूर चौफुली ते शिवसृष्टी परिसरातील अतिक्रमणे हटवली

येवला प्रतिनिधी : येवला शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता येवला नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

ह
या मोहिमेंतर्गत विंचूर चौफुली ते शिवसृष्टी या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच बसस्थानक ते विंचूर चौफुली या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत व मोकळा करण्याच्या दृष्टीने विशेष कारवाई करण्यात आली.

 म
येवला शहरातील बसस्थानक ते विंचूर चौफुली हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या परिसरात दुकानदारांचे अतिक्रमण, रस्त्यालगत लावण्यात येणारी वाहने तसेच इतर अडथळ्यांमुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. याची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी श्री. तुषार संजय आहेर आणि शहर पोलीस निरीक्षक श्री. संदीप मंडलिक यांनी पुढाकार घेत अतिक्रमण हटाव मोहिमेची सूत्रे हाती घेतली.

क्ष
या संयुक्त कारवाईमुळे रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे तसेच आपत्कालीन वाहनांना अडथळ्याविना मार्ग उपलब्ध व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांनीही सार्वजनिक रस्ते, फुटपाथ व चौकांमध्ये अतिक्रमण करू नये. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्यासोबतच वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी येवला नगरपरिषद व पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!