फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुलांसाठी मोफत पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजन
अहिल्यानगर दि १८ (जिमाका) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, ता.अकोले , जि. अहिल्यानगर या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले जि. अहिल्यानगर येथे फक्त अहिल्यानगर जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुलांसाठी 4 महिने कालावधीचे पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे निवासी व भोजन व्यवस्थेसह मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
दिनांक ०१ डिसेंबर २०२६ ते दिनांक ३१ मार्च २०२७ या कालावधीत आयोजित प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी फक्त अहिल्यानगर जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी प्रशिक्षणास आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहेत.
१) आवश्यक कागदपत्रे: इ.१२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड, डोमीसाईल दाखला. ४ (चार) पासपोर्ट साईज फोटो
२) शारीरिक पात्रता: वजन किमान ५० कि.ग्रॅ. असावे तसेच वय १८ ते २६ वर्षे व उंची कमीत कमी १६५ से.मी. असावी
३) निवड पध्दत : शारीरिक क्षमता चाचणी १६०० मिटर रनींग (मार्क-५०), लेखी परीक्षा (मार्क-५०) एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांची निवड मेरीटनुसार करण्यात येईल
४) दिनांक २६ नोव्हेबर २०२६ पर्यंतच उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारले जातील. त्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. (अर्ज भरावयाचे व जमा करावयाचे ठिकाण :- पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता.अकोले, जि. अहिल्यानगर)
अर्ज भरलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक २७/११/२०२६ रोजी सदर परीक्षेसाठी पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे सकाळी ठिक १०.०० वाजता मूळ व झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन मा. श्रीम. देवकन्या बोकडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर, ता. अकोले, जि.अहिल्यानगर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६ /८२७५३४९४१४ /९९६०११२६०० या संपर्क साधावा.














