आपला जिल्हा

आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावमध्ये भव्य ‘महा रक्तदान शिबिर’

मनिष जाधव 9823752964

आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावमध्ये भव्य ‘महा रक्तदान शिबिर’

सामाजिक बांधिलकीतून जय हिंद लोक चळवळ आणि आदर्श ग्रुपचा पुढाकार

जाहिरात

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – नाशिक पदवीधर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री. सत्यजीतदादा तांबे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव मध्ये एक भव्य ‘महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २ या वेळेत प्रभाग नंबर ६ मधील नाभिक समाज मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या विधायक उपक्रमामुळे वाढदिवसाचा बडेजाव टाळून समाजासाठी उपयुक्त कार्य करण्याचा एक आदर्श पायंडा पाडला जात आहे
या महा रक्तदान शिबिराची सुरुवात कोपरगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान हे स्वतः रक्तदान करून करणार आहेत. त्यांचा हा पुढाकार इतर रक्तदात्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

ए
हे महा रक्तदान शिबिर जय हिंद लोक चळवळीचे प्रणेते तथा माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आणि आदर्श ग्रुपचे संस्थापक मुकुंदजी भुतडा यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. वाढत्या वैद्यकीय गरजा आणि रक्ताची निकड लक्षात घेऊन या दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराचे अत्यंत नेटके नियोजन केले आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो, याच भावनेतून या सामाजिक उपक्रमाची आखणी करण्यात आली असून कोपरगावकरांमधून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील नाभिक समाज मंगल कार्यालयात आयोजित या शिबिरात परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि रक्तदात्यांनी रविवारी सकाळी ठीक १० वाजल्यापासून उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे आणि आमदार सत्यजीतदादा तांबे यांना रक्ताचे दान देऊन वाढदिवसाची अनोखी भेट द्यावी, अशी विनंती संयोजन समितीने केली आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!