आपला जिल्हा

अंदरसुलचा तरुण शेतकरी अमोल सोनवणे ‘कृषी पुरस्काराने सन्मानित

मनिष जाधव 9823752964

अंदरसुलचा तरुण शेतकरी अमोल सोनवणे ‘कृषी पुरस्काराने सन्मानित

येवला (प्रतिनिधी): शेती व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल गावचा तरुण, प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी सरचिटणीस अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस, अंदरसूल अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक अमोल सुभाष सोनवणे यांना जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, ‘आत्मा’ आणि माविमच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी कुंभ-2026’ कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. अंदरसुल गावासह संपूर्ण येवला तालुका आणि नाशिक जिल्ह्याच्या शेतकरी समुदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उ

अमोल सोनवणे यांनी आधुनिक शेती पद्धती, नवतंत्रज्ञानाचा वापर आणि दुग्ध व्यवसायातील प्रगत व्यवस्थापन यांचा प्रभावी संगम साधत शेतीला नवी दिशा दिली आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन, आधुनिक सिंचन पद्धती आणि दुग्ध व्यवसायातील नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे त्यांनी आपल्या शेतीला यशस्वी व आदर्श मॉडेल बनवले आहे.
अमोल सोनवणे यांच्या यशामुळे अंदरसुल गाव, येवला तालुका आणि नाशिक जिल्ह्याचे नाव उंचावले असून, शेतकरी वर्गासाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!