खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
कोपरगांव प्रतिनिधी मनिष जाधव – ज्योती सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव यांचेकडून कर्जदार शिवकिरण केशवराव आमले यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडी पोटी पतसंस्थेला दिलेला रु.५ लाख रुपयांचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी केस एस.सी.सी. नं.३०६ /२०२१ दाखल केली होती, तीमध्ये चौकशीअंती आरोपी शिवकिरण केशवराव आमले यांनी गुन्हा केल्याचे शाबीत झाल्याने श्री. भगवान धों. पंडीत वरिष्ठ स्तर न्यायाधिश साहेब यांनी आरोपीस ६ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच आरोपीने ज्योती पतसंस्थेस ७ लाखाची नुकसान भरपाई २ महिन्यात देण्याचा आदेश केला.

२ महिन्याचे आत नुकसान भरपाई न दिल्यास पुन्हा ६ महिन्यापर्यंत साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. याकामी ज्योती सहकारी पतसंस्थेतर्फे अॅड.श्री.एस्.डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.
