Uncategorized

श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कुंभारीत हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा

संपादक मनिष जाधव 9823752964

श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कुंभारीत हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा

कोपरगाव मनिष जाधव – रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्षा सौ सुहासिनीताई काकासाहेब कोयटे. आवर्जून उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा. कुंभारी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. देवयानीताई प्रशांतजी घुले. उपस्थित होत्या. तसेच कुंभारी ग्रामपंचायत च्या महिला सदस्य सौ. कविता ललित निळकंठ, सौ मनीषा सागर घुले, गं.भा. रंजनाबाई गायकवाड, तसेच श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव सौ. योगिता श्रीकांत पैठणीआदी व गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अ

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत भगवान राधाकृष्ण तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

इ
याप्रसंगी गावातील स्वातंत्र्य सैनिक भिकाजी काशिनाथ बढे यांच्या पत्नी सौ यमुनाबाई भिकाजी बढे यांचा ज्येष्ठ महिला म्हणून सन्मान सत्कार करण्यात आला यानंतर आशाताई जाधव यांचा वीर माता म्हणून सन्मान करण्यात आला तसेच राघवेश्वर मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या मीराताई, हिराताई महाजन, शीला पैठणी यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच गावातील लहान मुलांवर हरीपाठाच्या माध्यमातून चांगले संस्कार करणाऱ्या सौ.संगीता ताई भारती यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गावात अशा सेविका म्हणून काम करणाऱ्या संगीता शिंदे, ताराबाई चिने. यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत महिला कर्मचारी सौ नीता कदम व सौ अश्विनी पैठणी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गावातील विधवा महिला यांचाही सन्मान करून त्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले.

ऊ

याप्रसंगी गावातील महिला सौ ज्योती पवार यांनी महिलांना महिलांच्या विविध गुणाचे वर्णन करून दिले त्यामध्ये एक महिला बहीण, आई, पत्नी,आजी असे विविध पात्र जीवनात साकारते व महिलांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.

औ
तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख आतिथी सौ. सुवासिनीताई कोयटे यांनी त्यांच्या भाषणातून आईने आपल्या मुलांना कसे संस्कार दिले पाहिजे याविषयी माहिती दिली तसेच बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग सुरू केले पाहिजे तसेच महिला सक्षमीकरण याचा फायदा गावाला कसा होतो व कुंभारी गावांमध्ये एक छोटा मोठा लघुउद्योग सुरू करण्याचे आश्वासन दिले.

आ
कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. देवयानी घुले यांनी अध्यक्षिय मनोगतात गावातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे गावातील महिलांना सक्षम व सुरक्षित बनवण्यासाठी ग्रामपंचायत पुढील काळामध्ये ठोस पावले उचलेल असे प्रतिपादन केले.

ऐ
याप्रसंगी डॉक्टर संकेत पोटे यांनी महिलांना होणाऱ्या विविध आजारांविषयी व त्यांवरील उपचार याविषयी प्राथमिक माहिती महिलांना दिली. महिलांमधील हिमोग्लोबिन व रक्तपुरवठा वाढवण्यासाठी विविध उपाय त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या मनोगतनंतर उपस्थित सर्व महिलांपैकी एकूण 138 महीलाचे हिमोग्लोबिन, बीपी, व शुगर तपासण्यात आले यामध्ये डॉक्टर संकेत पोटे आरोग्य सेविका सुशीलाताई वाघ आरोग्य कर्मचारी ताराबाई चिने यांनी महिलांच्या आरोग्य विषयी माहिती घेऊन तपासणी केली.

ए
यानंतर उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू देऊन गुळाच्या भेली वाण म्हणून वाटप करण्यात आले तसेच उपस्थित महिलांसाठी मसाला दूध व नाष्टा , श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने देण्यात आले. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सायली निळकंठ व कुमारी निशा महाजन होत्या व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा घुले यांनी उपस्थितांचे व श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान महिला मंडळाचे आभार मानले

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!