रयत बँकेच्या व्हॉईस चेअरमनपदी निवडीबद्दल दिलीपराव डहाळे यांचा रयत सेवकांनी केला भव्य सत्कार
कोपरगाव मनिष जाधव –
संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या ,पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या बँकांमधील अग्रेसर बँक दि.रयत सेवक को – ऑपरेटिव्ह बँक लि. सातारा बँकेच्या व्हॉईस चेअरमनपदी कोपरगाव तालुक्यातील मढी येथील रहिवाशी असलेले दिलीपराव डहाळे सर यांचा १७ पैकी ११ मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल शनिवार दिनांक १६ डिसेंबर या कोपरगाव तालुक्यातील रयत सेवक संघाच्या वतीने रयत बँक शाखा कोपरगाव येथे आपला मान,आपला अभिमान म्हणत भव्य सत्कार संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत सेवक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक साहेबराव गायकवाड होते.तर माजी व्हॉईस चेअरमन सुरेशराव बोळीज,शिक्षक नेते विलासराव वाकचौरे,नानासाहेब गव्हाळे, छबूराव पाळंदे,पोपटराव बोठे,भाऊसाहेब माने,मुख्याध्यापक जी.एस. माळी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक उमेश बोढरे यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात साहेबराव गायकवाड म्हणाले की,रयत सेवकांची अर्थवहीनी असलेल्या बँकेच्या व्हॉईस चेअरमनपदी दिलीपराव डहाळे यांची झालेली निवड समस्त रयत सेवकांसाठी तसेच कोपरगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. रयत बँकेमध्ये रयत सेवकांच्या हिताचा कारभार करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध रहावे.
सत्काराला उत्तर देताना रयत बँकेचे नवनिर्वाचित व्हॉईस चेअरमन दिलीपराव डहाळे म्हणाले की,जेष्ठ मार्गदर्शक आणि निष्ठावंत सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आणि असंख्य हितचिंतक, मित्र व आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे मला हे यश प्राप्त झाले आहे.व्हॉईस चेअरमन म्हणून काम करत असताना सभासदांना योग्य न्याय देऊन सभासद हित जपण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही प्रा .दिलीपराव डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली.
याप्रसंगी संदीप चव्हाण,देविदास झाल्टे, योगेश सावळा इत्यादी शिक्षक बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम स्थळी योगेश पाटील,बाबासाहेब पवार,राहुल गोरे, गणेश गोसावी, राहुल अहिरे,योगेश ठाकरे, वेणुगोपाल अकलोड, मधुकर माळी, देवेंद्र भोये,अजित कोकणी, दिपक गावित, इब्राहिम गावित,विठ्ठल वसावे इत्यादी शिक्षक व रयत बँक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाल्मीक रौंदाळे यांनी मानले.