१२ ज्योतिर्लिंग पदयात्रेसाठी निघालेले मोनू (ब्लॅक पँथर) यांचे आज संवत्सर गावात आगमन
🚩🙏 हर हर महादेव! 🙏🚩
१२ ज्योतिर्लिंग पदयात्रेसाठी निघालेले मोनू (ब्लॅक पँथर) यांचे आज संवत्सर गावात आगमन झाले. यावेळी गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पदयात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. 🚩🙏

यावेळी गावातील प्रमुख नागरिक, युवक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गावात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. 🚩🔱

यावेळी संजीवनी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन श्री. आप्पासाहेब दवंगे, संजीवनी सहकारी पतसंस्था कोपरगावचे चेअरमन श्री. राजेंद्रभाऊ परजणे, संजीवनी कारखान्याचे माजी संचालक श्री. बाळासाहेब शेटे, भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंदमामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य श्री. महेशभाऊ परजणे, भाजपा पूर्व मंडल कोपरगाव सदस्य श्री. सचिनभाऊ शेटे, श्री. अनुपभाऊ शिंदे, श्री. अनिलभाऊ शेटे, श्री. चिमाभाऊ दैने, श्री. राजेंद्रआबा बोरनारे, श्री. योगेशभाऊ परजणे, श्री. बाळासाहेब रानोडे, श्री. नंदुभाऊ परजणे, श्री. दिलीपराव कासार, श्री. दिनेशराव बोरनारे, श्री. संदीपभाऊ मैंद, श्री.अनिलभाऊ भाकरे श्री. योगेशभाऊ नेहे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚩🔱 हर हर महादेव!
🙏🚩 जय श्रीराम! 🚩🙏













