आपला जिल्हामहाराष्ट्र

सामाजिक विकासासाठी भौतिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक विकास देखील महत्त्वाचा – डॉ.सुधीरजी तांबे

मनिष जाधव 9823752964

सामाजिक विकासासाठी भौतिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक विकास देखील महत्त्वाचा – डॉ.सुधीरजी तांबे

संगमनेर प्रतिनिधी – कवी अनंत फंदी हे महाराष्ट्राच्या मातीतील एक अनमोल प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्राची प्रसिद्ध लोककला तमाशा यामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन मनोरंजना बरोबरच नीती शिक्षण तसेच सांस्कृतिक जीवनमूल्य रुजविण्याचे महान कार्य त्यांनी केले असल्याचे मत डॉ.सुधीरजी तांबे यानी व्यक्त केले.

अ
Oplus_16908288

कवी अनंत फंदी प्रतिष्ठान व सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच भाऊसाहेब गुंजाळ पाटील सहयाद्री ज्यु. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘वाद-विवाद स्पर्धा’आयोजित करण्यात आली होती. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.आ.डॉ सुधीरजी तांबे हे होते.

ऊ
Oplus_16908288

कवी अनंत फंदी यांनी लावणी बरोबरच समाजातील ज्वलंत विषयावर पोवाड्यांची रचना करुन मराठी साहित्य आजरामर केले आहे. पेशवे दरबारात राजाश्रय लाभलेले सुप्रसिद्ध शाहीर अनंत फंदी यांनी आपल्या शाहिरी कवणांच्या माध्यमातून संगमनेर व महाराष्ट्राचे नाव आखिल भारतीय पातळीवर पोहचविल्याचे मत डॉ.तांबे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र भंडारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना कवी अनंत फंदी यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन उपस्थित सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

औ
Oplus_16908288

या स्पर्धेसाठी कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.सुनिल चांडक, सचिव श्री.अरुण ताजणे, श्री.जसपाल डंग, श्री.सुरेश परदेशी, एस.एम.बी.एस.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.बाळासाहेब वाघ, भाऊसाहेब गुंजाळ सह्याद्री ज्यु. कॉलेजचे प्राचार्य प्रा.एस.एम.खेमनर, उपप्राचार्य प्रा.संजय सुरसे, नॅक समन्वयक डॉ.लक्ष्मण घायवट, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी डॉ.रावसाहेब ननवरे, डॉ.जितेंद्र पाटील, श्री.संदीप वाकचौरे परीक्षक म्हणून उपस्थित होते.
सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास स.ब.वि.प्र.समाज संस्थेचे संचालक प्रा. बाबा खरात सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये सांघिक विजेता पारितोषिक आदित्य दराडे व प्रथमेश गिरी (विधी महाविद्यालय,संभाजीनगर)यांनी पटकाविले, वैयक्तिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आदित्य ज्ञानेश्वर दराडे, (संभाजीनगर) व्दितीय क्रमाकांचे पारितोषिक चैतन्य रावसाहेब गर्जे तृतीय क्रमांकाचे परितोषिक विश्वास संतोष दसगुडे तसेच प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक माएशा शेख, व्दितीय उत्तेजनार्थ पारितोषिक पुजा सुदाम पवार तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक रूचिका सुनिल जोंधळे या विद्यार्थिनीस प्राप्त झाले.
या वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.बाळासाहेब वाघ यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र जोरवर, प्रा.मनोज जगताप, प्रा.राहुल कदम प्रा.मिनेश सातपुते, डॉ. स्वाती ढुबे श्रीमती माधुरी भुसाळ, प्रा. भाऊसाहेब धाकतोडे, प्रा.प्रवीण वर्पे, श्रीमती प्रा.गायत्री काळे मॅडम, प्रा. गोरक्षनाथ भवर प्रा. नानासाहेब जगताप आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. संतोष भालेराव सर यांनी केले तर सह्याद्री ज्यु. कॉलेजचे प्राचार्य प्रा.एस.एम.खेमनर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!