आपला जिल्हापुणेमहाराष्ट्र

संस्कृती पापड उद्योग ; ग्रामीण विकासाचा नवा मार्ग – रुपालीताई चाकणकर

मनिष जाधव 9823752964

संस्कृती पापड उद्योग ; ग्रामीण विकासाचा नवा मार्ग – रुपालीताई चाकणकर

Vishal
Oplus_16908288

कोपरगाव मनिष जाधव – स्थानिक उद्योगांना चालना देणे आणि पारंपरिक उत्पादनांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे या हेतूने कार्यरत संस्कृती पापड उद्योग, कोपरगाव या राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार प्राप्त संस्थेचे संस्थापक संचालक कावेरी राऊत व विशाल राऊत यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर यांची सदिच्छा भेट घेतली.

Ruapli

या भेटीदरम्यान राऊत दांपत्यांनी रुपालीताई चाकणकर यांना कोपरगावात तयार होणारा पौष्टिक नागली पापड भेट देत त्यांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, “संस्कृती पापड उद्योगासारखे स्थानिक उद्योग केवळ गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करीत नाहीत, तर अनेक महिलांना रोजगार, स्थैर्य आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी देत आहेत. अशा उद्योगांमुळे ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकासाची गती निर्माण होते.”

P
Oplus_16908288

राऊत दांपत्यांनी उद्योगाच्या प्रवासाची, महिलांच्या सहभागाची आणि निर्यातक्षम उत्पादननिर्मितीची माहिती रुपालीताईंना दिली. याप्रसंगी मा. चाकणकर यांनी उद्योगाच्या प्रयत्नांचे कौतुक करत भविष्यात आवश्यक ते मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले. स्थानिक उत्पादकांचे मनोबल वाढविणारी ही भेट परिसरात सकारात्मक चर्चेचा विषय ठरत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!