आपला जिल्हा

राष्ट्रवादीच्या गटनेत्या व नगरसेवकांना  स्वतंत्र दालन द्या – गटनेत्या गौरी पहाडे

संपादक दैनिक जनसंजीवनी मनिष जाधव 9823752964

राष्ट्रवादीच्या गटनेत्या व नगरसेवकांना  स्वतंत्र दालन द्या – गटनेत्या सौ.गौरी पहाडेंची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव नगरपरिषदेच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एकूण ११ व स्वीकृत ०१ असे एकूण १२ नगरसेवक निवडून आलेले आहेत. कोपरगाव नगरपरिषदेच्या कामकाज संदर्भात व कोपरगाव शहराच्या विकासाबाबत विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात गटनेते व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका सौ. गौरी  पहाडे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

ऊ

दिलेल्या पत्रात सौ. गौरी  पहाडे यांनी असे म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या दररोजचे कामकाज तसेच कोपरगांव शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक नियमितपणे कोपरगाव पालिके उपस्थित राहणार आहे. तसेच नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व प्रत्येक प्रभागातील होणाऱ्या विकास कामांची माहिती नागरीकांना सविस्तरपणे देवून त्यांच्या सर्व तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे.

त्यासाठी गटनेत्या व  सर्व नगरसेवकांना स्वतंत्र दालनाची आवश्यकता आहे. त्यासाठी  कोपरगांव नगरपरिषद कार्यालयात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देवून सहकार्य करावे असे सौ.गौरी पहाडे यांनी शेवटी म्हटले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!