आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

मतदारांच्या चर्चेत एकच नाव – फंड आणि भुतडांचा वाढता प्रभाव

मनिष जाधव 9823752964

मतदारांच्या चर्चेत एकच नाव – फंड आणि भुतडांचा वाढता प्रभाव

कोपरगाव प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 6 मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार सारिका फंड व मुकुंद रामेश्वर भुतडा तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत वर्चस्व असुन प्रचारात देखील मोठी आघाडी घेतली आहे.

अ
काका कोयटे

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये राजकीय तापमान चांगलेच तापलेले असून या प्रभागात नगरसेवक पदाचे उमेदवार सारिका फंड आणि मुकुंद रामेश्वर भुतडा यांनी जोरदार प्रचार मोहीम राबवत प्रभागात ठोस वर्चस्व निर्माण केले आहे.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब कोयटे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा प्रचार अधिक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचणारा यशस्वी ठरत आहे.

औ
Oplus_16908288

गेल्या आठवडाभरात या दोन्ही उमेदवारांनी प्रभागात घराघरातून भेटी देत नागरिकांची मते, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, गटारी, सार्वजनिक सोयीसुविधांची कमतरता, महिलांसाठी सुरक्षाविषयक मुद्दे अशा अनेक विषयांवर नागरिकांशी संवाद साधत समस्या सोडविण्याचा ठोस आराखडा मांडण्यात आला आहे.
महिलांशी विशेष संवाद सत्र, तरुणांसोबत चर्चा, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे, स्थानिक मंडळांच्या भेटी अशा विविध उपक्रमांमुळे या उमेदवारांचा संपर्क सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचत आहे. नागरिकांनीही त्यांच्या कामाच्या दृष्टिकोनाचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

उ
सारिका सुनील फंड

काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या एकत्रित प्रचार मोहिमेमुळे प्रभागातील वातावरण आणखी उत्साही झाले आहे. तर आमदार आशुतोष काळे यांच्या रणनीती आणि मार्गदर्शनामुळे प्रभागात विकासाभिमुख आणि प्रश्नांना प्राधान्य देणारी टीम म्हणून ही उमेदवारी उभी राहत असल्याचे मतदारांतून व्यक्त होत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!