प्रभाग क्रमांक ६ मध्ये मुकुंद भुतडा ठरले विश्वासाचे नेतृत्व

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – कोपरगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये सामाजिक कार्यकर्ते व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मुकुंद भुतडा यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सातत्यपूर्ण जनसंपर्क, नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याची भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे प्रभागातील नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रभागात सकारात्मक बदल घडून येत आहेत. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत, तसेच तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे मुकुंद भुतडा हे प्रभागातील आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.
अलीकडील विविध सामाजिक उपक्रम, विकासकामांची पाहणी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेली धावपळ यामुळे त्यांच्या कार्याची चर्चा प्रभागापुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहरात होत आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे,” अशी भूमिका घेत मुकुंद भुतडा यांनी पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक ६ मध्ये मुकुंद भुतडा यांचा वाढता जनाधार आणि विश्वास हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचीच पावती देत असून, येणाऱ्या काळात त्यांचा प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.














