नवरात्रीच्या रंगोत्सवाला दागिन्यांची साथ; ‘साई निधी क्रिएशन’चे ९ रंगांचे मंगळसूत्र विशेष आकर्षण
अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी संपर्क : ९७६६३९७८७१
कोपरगाव मनिष जाधव – नवरात्रीच्या पावन पर्वाला पारंपरिक सौंदर्याची आणि आधुनिक दागिन्यांची आकर्षक जोड देत ‘साई निधी क्रिएशन’ ने महिलांसाठी ९ रंगांमध्ये उपलब्ध असलेले मंगळसूत्रांचे विशेष कलेक्शन सादर केले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवासाठी विविध रंगसंगतीतील मंगळसूत्रांची ही आकर्षक श्रेणी महिलांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवरात्री म्हणजे भक्ती, परंपरा आणि रंगांचा उत्सव. याच उत्सवी वातावरणाचा विचार करून साई निधी क्रिएशनकडून विविध रंगांच्या आकर्षक पेंडंटसह मंगळसूत्रांचे डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पारंपरिक काळ्या मण्यांची मोहक रचना, त्यासोबत मोती व रंगीत खड्यांची आकर्षक सजावट यामुळे या मंगळसूत्रांना उठावदार रूप प्राप्त झाले आहे.

पिवळा, लाल, नारंगी, निळा, जांभळा, हिरवा, आकाशी, राखाडी आणि पांढरा अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे मंगळसूत्र नवरात्रीतील प्रत्येक दिवसाच्या रंगाशी जुळवून परिधान करता येण्याची संकल्पना या कलेक्शनमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे पारंपरिक पोशाखासोबत तसेच आधुनिक पेहरावासोबतही हे दागिने आकर्षक ठरणार आहेत.
‘परंपरा, रंग आणि तुमच्या खास क्षणांसाठी…’ या संकल्पनेतून साई निधी क्रिएशनने दागिन्यांच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार विविध डिझाईन्स उपलब्ध असून, नवरात्रीच्या निमित्ताने खास कलेक्शन पाहण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.













