आपला जिल्हानाशिक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मातोश्री विद्यालयाची यशाची हॅट्ट्रिक

मनिष जाधव 9823752964

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मातोश्री विद्यालयाची यशाची हॅट्ट्रिक

विज्ञानाच्या व्यासपीठावर मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयाचा यशस्वी ठसा

५३वा येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एम. एस. जी. एस. शैक्षणिक संकुलाचे घवघवीत यश संपादन..

येवला प्रतिनिधी – शिक्षण विभाग पंचायत समिती येवला, येवला तालुका विज्ञान अध्यापक संघ आयोजित गवंडगाव येथील जनता विद्यालय येथे दि.२९ व ३० डिसेंबर रोजी पार पडलेल्या ५३वा येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम, सेमी इंग्लिश मिडीयम व ज्यू.कॉलेजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यात एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयमला विद्यार्थी प्राथमिक गटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाला. त्यात सहभागी विद्यार्थी राजवीर अमोल सोनवणे, ओवी अतुल सोनवणे व आराध्या ज्ञानेश्वर राजुळे. तसेच प्रयोग शाळा परिचर गटात द्वितीय क्रमांक मिळाला.त्यात सहभागी शिक्षक अजीम पटेल हे होते. सर्वांना प्रिन्सिपल अल्ताफ खान, नीलिमा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

ऊ
Oplus_16908288

तसेच एम.एस.जी.एस. माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सुजाता उत्तम भागवत यांनी प्राथमिक शिक्षक गटात शैक्षणिक साहित्य प्रतिकृती मध्ये द्वितीय क्रमांक पारितोषिक मिळविले. तसेच एम.एस.जी.एस. ज्यू.कॉलेजच्या प्राध्यापिका वैशाली दिलीप शिंदे यांनी माध्यमिक शिक्षक गटात शैक्षणिक साहित्य प्रतिकृती मध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक मिळवून जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. तसेच एम.एस.जी.एस. माध्यमिक विद्यालयचे महेश विजय मेहेत्रे प्रयोग शाळा गटात यांनी तृतीय क्रमांक मिळाले. सर्व पारितोषिक बाळासाहेब क्षीरसागर (सभापती मराठा विद्या प्रसारक समाज), नंदकुमार बनकर (संचालक मराठा विद्या प्रसारक समाज), मकरंद सुधाकर सोनवणे (खजिनदार अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ), किसन काका धनगे, अर्जुन कोकाटे, मनिषा वाकचौरे व सोळंकी मॅडम, नारायण डोखे सह इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
सर्व यशस्वी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयुर सोनवणे, प्रशासकीय अधिकारी प्रा.आर.बी. गायकवाड, जीवन गाडे, डॉ.भागीनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, सौ.संगीताताई सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनीताताई अमोल सोनवणे, प्रिंसिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्या डॉ.सुवर्णा कडलग, शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सुनील सपकाळ, मयूर भागवत, संदीप बोढरे, सचिन बोढरे, सचिन घोडके, राजेश कांबळे, गोकुळ वाणी, विजय भाटे, संतोष जाधव, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनिता वडे, दिपाली सोनवणे, सुषमा सोनवणे, सातळकर, साक्षी देशमुख, खुशी वाडेकर, धनश्री काळंगे, वैष्णवी चव्हाण, पूनम जमधडे, तेजश्री सोनवणे, अभिलाषा आहेर, शोभा निकम यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!