Uncategorized

कोपरगाव येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

संपादक मनिष जाधव 9823752964

कोपरगाव येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

महिलांचे ढोल पथक व कु. अक्षरा कानडे हीचे लाठीकाठी प्रात्यक्षिक ठरले मिरवणुकीचे आकर्षण…

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव– राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचालित शहर व तालुका चर्मकार संघ यांचे वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलपसाहेब उर्फ नानासाहेब यांच्या व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ऊ

Adds 3

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची भव्य अशी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन सौ.वश्री.किसनराव कानडे यांचे हस्ते करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरणुकीत चर्मकार महिलांचे ढोल पथक आणि कु. अक्षरा गणेश कानडे या चिमुकलीने सादर केलेले लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरले.

ऊ
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेपुतळा चौक गोदावरी पेट्रोल पंप, मार्केट यार्ड, जुना टाकळी नाका, समाजमंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक झाली. त्यानंतर समाज मंदिर येथे ह. भ. प. मनसुख महाराज दहे यांनी श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या महान कार्याचे महत्व प्रवचनाद्वारे विषद केले.

Sai
यावेळी महाप्रसादाचे मानकरी संतोष बनसोडे सौ रुपाली बनसोडे, राजेंद्र वाघ, रामदास वाघ यांचा तसेच समाज भुषण पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपभाऊ कानडे, आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित संजयजी दुशिंग यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे खासदार सदाशिवराव लोखंडे आमदार आशुतोष दादा काळे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, मा. आमदार भाऊसाहेब कांबळे, सौ. सरस्वती भाऊसाहेब वाकचौरे राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपाध्यक्ष एम. डी. कानडे साहेब, उत्तर महाराष्ट्र महीला आघाडी अध्यक्षा मनिषाताई पोटे, समाजातील ज्येष्ठ माजी तहसीलदार मा. डी. आर. दुशिंगसाहेब, भाऊसाहेब कानडे, कोकमठाण सरपंच सौ. उषाताई दुशींग, रवंदा सरपंच सौ .शोभाताई भवर, रवंदा उपसरपंच ऋषिकेश कदम, वसंतराव थोरात, शिवसेना तालुका अध्यक्ष रावसाहेब थोरात, अँड नितीन पोळ, शरद त्रिभुवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कृष्णा आढाव, चंद्रशेखर म्हस्के, आकाश डागा, फकीर महंमद कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, विरेन बोरावके, अनिरुद्ध काळे, नवाज कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे यांनी तर सूत्रसंचालन संजयजी दुशिंग यांनी केले. तर आभार तालुका अध्यक्ष माधवराव पोटेसर व शहर अध्यक्ष गणेश ज्ञानेश्वर कानडे यांनी मानले.

Match
राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. स्नेहाताई कानडे यांनी समाजमंदिरासाठी वाढीव जागा मिळवी याकरिता आमदार आशुतोषदादा काळे यांचे कडे मागणी केली असता त्याबाबत आमदार काळे यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला व लवकर मार्गीलावू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशींग, संजय पोटे, देविदास कानडे, राकेश धाकतोडे, संतोष कानडे, मयूर कानडे, संदेश कानडे, संतोष दळवी, संतोष बारसे, संदीप बारसे, गणेश शिंदे, गणेश दळवी, सागर पोटे, संतोष शिंदे, अँड. रमेश दुशिंग, जगन कानडे, रमेश मगर सर, संकेत कानडे, बबलू कानडे, अनिल कानडे, दत्तात्रय पठाडे, योगेश मगर, गोरक्षनाथ कानडे, महेश कानडे, संदेश कानडे, भैय्या कानडे, आदींनी परिश्रम घेतले.
ढोल पथकामध्ये सौ. स्नेहाताई कानडे, सौ. जयश्री कानडे, सौ. मोनिका दुशिंग, सौ. सुलेखा पोटे, सौ. शिवानी कानडे, सौ. शोभा कानडे, सौ. सविता पोटे, कु.ऋतुजा कानडे, कु. सुष्टी पोटे, कु. गायत्री पोटे, कु. गायत्री पठाडे, कु. मयुरी भारुळे, सौ.संगिता कानडे, सौ.मिराबाई दुशिंग, सौ.चंद्रकला कानडे, सौ. लिलाताई पोटे, गिरीजाताई कानडे आदींनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी मारूती सरवार सर, मा.पो.निरीक्षक शिरसाठ साहेब, रमेश गायित्रे, डॉ. सातपुते, माधवराव पोटे मेजर, कैलास सातपुते, संजय सरवार, बाळासाहेब सोनटक्के, बबनराव पोटे, अण्णासाहेब बारसे, जगणराव वाकचौरे, दत्तात्रय गायित्रे, मच्छिंद्र आहेर, सोमनाथ कुऱ्हाडे, गुलाब धाकतोडे, नितिन कानडे, दिपक कांबळे, राजेंद्र दळवी, भाऊसाहेब धाकतोडे, राजेंद्र पोटे, पवार सर, भिमा भागवत, पोपटराव शिंदे, संजय कानडे, आदित्य कानडे, नवनाथ कानडे, सोमनाथ लोहकरे, रामेश्वर कानडे, वसंत भागवत, ह.भ.प. माऊली महाराज, मनोज कानडे, चंद्रकांत कानडे, कचरू लोहकरे, स्वप्निल कडू, बाबुराव सातपुते, संजय सातपुते, देविदास कानडे, टोणपे, वाघ आदींसह समाज बांधव व महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!