अहिल्यानगरमध्ये चमकली संजीवनीची दमदार जोडी
राज्यस्तरीय तलवारबाजीमध्ये प्रवेश
कोपरगाव मनिष जाधव – अहिल्यानगर येथे लोकमततर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन खेळाडूंनी उत्तुंग भरारी घेत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. साईदुर्ग शिवराज पाळणे याने ब्रॉन्झ मेडल, तर पार्थ चंद्रकांत भिंगारे याने सिल्व्हर मेडल पटकावत जिल्हा स्तरावर आपली छाप उमटवली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर दोघांचीही संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिन दादा कोल्हे, प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैय्या कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेक कोल्हे, मुख्याध्यापक मोहसिन शेख सर, क्रीडा विभाग प्रमुख अनुप गिरमे सर यांनी दोन्ही खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक राहुल रुईकर सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
संस्थेच्या सर्व मान्यवरांनी खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. संजीवनी परिवाराकडून दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी यशाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.














