आपला जिल्हा

संतोष दावखर यांच्या थ्रिलर ‘गोंधळ’ची देशभरात १३ नोव्हेंबरला रिलीज; FFIच्या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली!

मनिष जाधव 9823752964

संतोष दावखर यांच्या थ्रिलर ‘गोंधळ’ची देशभरात १३ नोव्हेंबरला रिलीज; FFIच्या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली!

मुंबई, ऑक्टोबर २०२६: १८ सप्टेंबर २०२६ रोजी फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI)ने ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२७) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या श्रेणीत भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड केल्यानंतर, समीक्षकांची प्रशंसा मिळवणारा मराठी लोक-थ्रिलर चित्रपट गोंधळ आता १३ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये भव्य प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

ञ
दावखर फिल्म्सच्या बॅनरखाली लिहिलेल्या, दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटाला समीक्षकांकडून व्यापक प्रशंसा मिळाली आहे. आता हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोंधळ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.
ऑस्करच्या शर्यतीपूर्वी एका अस्सल प्रादेशिक कथेला देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना दिग्दर्शक संतोष दावखर यांनी अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले:
“‘गोंधळ’ बनवायला सुरुवात केली, तेव्हा आमचं एकमेव ध्येय होतं ते म्हणजे आपल्या मातीची अस्सल संस्कृती, गूढ लय आणि आजवर न सांगितलेल्या पैलूंशी प्रामाणिक राहणं. आपल्या मुळांशी घट्ट जोडलेल्या या लोक-थ्रिलरला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की तो ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावूक करणारी गोष्ट आहे. आता १३ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जणू ही कथा आपला प्रवास पूर्ण करून पुन्हा आपल्या मुळांकडे परत येत आहे, असं वाटतं.”
ते पुढे म्हणाले, “भावना प्रामाणिक आणि मनापासून व्यक्त झाल्या, की सिनेमाला भाषेच्या सीमा अडवत नाहीत. भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना हा पवित्र आणि थरारक प्रवास एकत्रितपणे मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे, याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
महाराष्ट्राच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणारा गोंधळ हा आसक्ती आणि विश्वासघाताच्या काळोख्या, रहस्यमय जाळ्यात घेऊन जाणारा चित्रपट आहे. सुमन नावाची तरुणी एका कोंडमारा करणाऱ्या आणि दुःखी वैवाहिक जीवनात अडकलेली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना ती आपल्या प्रियकर सरजेरावच्या पारंपरिक आणि पवित्र गोंधळ विधीबद्दल असलेल्या तीव्र, कट्टर आसक्तीचा फायदा घेते.
रात्रीच्या अंधारात पार पडणाऱ्या या पारंपरिक लोकविधीदरम्यान स्थानिक सत्तासंघर्ष, लपलेले हेतू आणि गुप्त विश्वासघात एकमेकांशी भिडतात. पाहता पाहता गावातील एक पवित्र रात्र गुन्हेगारी, रहस्य आणि त्याच्या परिणामांनी भरलेल्या एका धोकादायक खेळात रूपांतरित होते. पहाट होण्यापूर्वी या सगळ्यामागचं सत्य समोर येणार असतं.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर आणि अनुज प्रभू हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे, तर अमलेंदू चौधरी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!