परम सदगुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात साजरा होणार –
हेमंत पटवर्धन
कार्यक्रमाचे ठिकाण : परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर, श्री क्षेत्र बेट-कोपरगाव, नगर-मनमाड रोड, कोपरगाव, जि. अहिल्यानगर.
कोपरगाव मनिष जाधव – हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यातील शके १९४८, श्रावण शुद्ध अष्टमी, गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी श्री क्षेत्र बेट-कोपरगाव येथील परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांचा भव्य जन्मोत्सव तसेच शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य पालखी मिरवणूक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष श्री. हेमंत माधवराव पटवर्धन यांनी केले आहे.

परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या भक्तांसाठी श्रावण महिना अत्यंत श्रद्धेचा व आनंदाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र बेट-कोपरगाव येथील परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती मंदिराचे अध्यक्ष श्री. हेमंत माधवराव पटवर्धन यांनी दिली.
धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता परम सद्गुरूंचे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता श्री गुरु शुक्राचार्य मुखवटा स्थापना व पुण्याहवाचन करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजल्यापासून परम सद्गुरूंची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी १०.३० वाजल्यापासून शुक्र जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. दुपारी १२ वाजता मध्यान्ह महाआरती होणार असून, त्यानंतर दुपारी १२.३० वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण सोहळ्यामुळे बेट-कोपरगाव परिसरात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, परिसरातील तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
संत-महंतांची प्रमुख उपस्थिती
या धार्मिक सोहळ्यास प.पू. महंत रमेशागिरीजी महाराज (संत जनार्दन स्वामी आश्रम, बेट-कोपरगाव), प.पू. महंत परमानंदजी महाराज (जंगली महाराज आश्रम, कोकमठाण) तसेच प.पू. महंत रायवेश्वरानंदगिरीजी महाराज (श्री रायवेश्वर देवस्थान, कुंभारी) यांची शुभेच्छापर उपस्थिती लाभणार आहे.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
कार्यक्रमास मा. श्री. आशुतोषदादा अशोकराव काळे (आमदार, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) तसेच मा. श्री. विवेकभैय्या विपीनदादा कोल्हे (आमदार, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाप्रसादासाठी संयोजक
महाप्रसादाच्या आयोजनासाठी मा. श्री. अमोल अशोक भुसारे, मा. श्री. आनंद दत्तात्रय टिकेकर, मा. श्री. आशिष अंबादास कोल्हे, मा. श्री. सतीश सुभाष कोतकर, मा. श्री. तुषार प्रवीण जमदाडे आणि मा. श्री. चंद्रशेखर भास्करराव रहाणे हे संयोजक म्हणून कार्यरत आहेत.
मंदिर प्रशासन व विश्वस्त मंडळाचे योगदान
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे अध्यक्ष श्री. हेमंत माधवराव पटवर्धन, सचिव अॅड. श्री. गजानन विश्वेश्वर कोन्हाळकर, खजिनदार श्री. बाळासाहेब म्हाळजी आव्हाड, सदस्य अॅड. श्री. संजीव दत्तात्रय कुलकर्णीआणि सदस्य श्री. सुहास लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.
तसेच श्री कोपरगाव बेट देवस्थान मंदिर प्रशासन, सर्व ट्रस्टी, सर्व बेट ग्रामस्थ, ब्रह्मवृंद, कर्मचारी, बेटातील तरुण मंडळे, मित्र परिवार व शिव-शुक्र भक्तगण यांच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव आणि शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित पालखी मिरवणूक, धार्मिक विधी, महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ परिसरातील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री कोपरगाव बेट देवस्थानचे अध्यक्ष श्री. हेमंत माधवराव पटवर्धन यांनी केले आहे.
श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम असलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने बेट-कोपरगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.














