आपला जिल्हा

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक- पो. नि. डमाळे

मनिष जाधव 9823752964

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक- पो. नि. डमाळे

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असून याचे जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहे. त्यामुळे आजच्या या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.डमाळे यांनी व्यक्त केले. के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच विद्यार्थी मार्गदर्शन सत्र पार पडले, त्यात ते बोलत होते.

ऋ
कोणत्याही ध्येयापर्यंत जाताना अथक परिश्रम गरजेचे असते, तसेच निश्चित ध्येय असणे सुद्धा गरजेचे असते. ते लवकरात लवकर ओळखणे हे लाभदायक ठरते. मात्र आपल्या करिअरच्या या प्रवासात मोबाईलचा अती वापर, इंटरनेटचा चुकीचा वापर तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा धोका हे देखील आव्हान आपण ओळखले पाहिजे आणि त्याबाबत सजग असले पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जात आहेच, त्यासोबतच महाविद्यालयाच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोपरगाव पोलिस दलाचे नेहमीच भरीव सहकार्य राहिले आहे, त्याबद्दल महाविद्यालय नेहमीच कृतज्ञ आहे.
यावेळी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे हे ही उपस्थित होते. आभार प्रा. संदीप जगझाप यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. जावेद शाह यांनी केले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!