आपला जिल्हाविखे

ज्ञानसरिता विद्यालयात शालेय आरोग्य व किशोरवयीन आरोग्य जनजागृती कार्यक्रम

मनिष जाधव 9823752964

ज्ञानसरिता विद्यालयात शालेय आरोग्य व किशोरवयीन आरोग्य जनजागृती कार्यक्रम

अहिल्यानगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या सहकार्याने वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी व किशोरवयीन आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ऊ

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व समजावून देणे, वैयक्तिक स्वच्छता, योग्य पोषण, निरोगी जीवनशैली तसेच किशोरवयीन आरोग्याबाबत योग्य माहिती देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या सामान्य आरोग्य समस्या तसेच किशोरवयीन वयातील आरोग्यविषयक अडचणींबाबत विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

यावेळी विविध आरोग्यविषयक विषयांवर पोस्टर प्रदर्शन, प्रात्यक्षिके आणि जनजागृतीपर स्किट सादर करण्यात आले. मासिक पाळीचे आरोग्य व व्यवस्थापन, गुड टच-बॅड टच, स्व-स्तन तपासणी व लवकर निदानाचे महत्त्व, तोंडाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंध व तपासणी, योग्य पोषण, वैयक्तिक स्वच्छता, निरोगी जीवनशैली आणि किशोरवयीन मुलींमध्ये आढळणाऱ्या सामान्य आरोग्य समस्यांबाबत विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी पद्धतीने माहिती देण्यात आली.

संवेदनशील आरोग्यविषयक विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटाला अनुरूप पद्धतीने समजावून सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घेण्याबरोबरच दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष अमर गुरव आणि CSR सुनील कटारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थिती व सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन व संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डॉ. अभिजित दिवटे, संचालक (मेडिकल) तसेच डॉ. सतीश मोरे, वैद्यकीय अधीक्षक यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच डॉ. अपूर्वा देशमुख, रेसिडेंट स्त्रीरोगतज्ज्ञ आणि डॉ. ऐश्वर्या तळवलकर, ज्युनिअर रेसिडेंट, बालरोगतज्ज्ञ यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्य तसेच प्रा. डॉ. योगिता औताडे, उपप्राचार्य व विभागप्रमुख, समुदाय आरोग्य परिचर्या विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. सुंबे सर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल अनप, दिनेश मगर, कु. प्रिती कडू आणि कु. स्नेहल घोडेकर यांनी समन्वय साधला.

आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, पोस्टर प्रदर्शन, प्रात्यक्षिके आणि स्किटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य समस्या लवकर ओळखणे, वेळेवर तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा घेणे याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!