आपला जिल्हा

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य रक्षाबंधनानिमित्त संदीप विदुर यांचा स्तुत्य उपक्रम

मनिष जाधव 9823752964

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य रक्षाबंधनानिमित्त संदीप विदुर यांचा स्तुत्य उपक्रम

संगमनेर : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संदीप विदुर यांच्या वतीने शारदा शिक्षण संस्थेच्या श्री. किसन कस्तुरचंद लोहे ट्रस्ट बालवाडी, संगमनेर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे बालवाडीतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

अ

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सण असून, या सणानिमित्त विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

ङ

च

यावेळी बालवाडीचे मुख्याध्यापक एरंडे सर यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संदीप विदुर यांचा शैक्षणिक संस्थेच्या वतीने सत्कार करून त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी आणि शैक्षणिक संस्थेतील चिमुकल्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी संगमनेर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन महिला अध्यक्षा स्विटी विदुर यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बालवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक जाणीव, माणुसकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता जपणाऱ्या अशा उपक्रमांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!