आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे कोच श्री विवेक नायकल यांची स्लोवाकिया येथे पार पडणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी फ्री टाईल कुस्ती स्पर्धेच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
कोपरगाव – युरोप खंडातील स्लोवाकिया येथे पार पडणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे इंटरनॅशनल कोच विवेक नायकल यांची भारतीय कुस्ती महासंघ आणि भारतीय ऑलिंपिक संघ यांचे वतीने फ्री टाईल कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक संघटनेच्या मान्यतेने या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून भारतीय पैलवानांच्या तयारीसाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी विवेक नायकल यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरणार आहे.
या पूर्वी मार्च महिन्यात पार पडलेल्या लेव्हल 2 इंटरनॅशनल कोचींग कोर्स मध्ये त्यांनी एफ श्रेणीत उत्तम यश संपादन केले होते. तसेच 2024 मध्ये अल्बेनिया-युरोप येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ही त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून मोलाची जबाबदारी सांभाळली होती. श्री विवेक नायकल हे सध्या प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठाच्या कुस्ती केंद्रात प्रमुख कोच म्हणून सेवा देत आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आत्मा मालिक परिवाराच्या वतीने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.














