Uncategorized

संवत्सर येथील उद्योजक रवींद्र वाघ यांच्या अगरबत्ती उद्योगाला उत्स्फूर्त प्रतिसाद – मुकुंद मामा काळे

मनिष जाधव 9823752964

संवत्सर येथील उद्योजक रवींद्र वाघ यांच्या अगरबत्ती उद्योगाला उत्स्फूर्त प्रतिसाद – मुकुंद मामा काळे

संवत्सर प्रतिनिधी – येथील उद्योजक श्री. रवींद्र पंडित वाघ यांनी “आर आर प्रीमियम अगरबत्ती” या नावाने सुरू केलेल्या अगरबत्ती उद्योगाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फॅब्रिकेशन व्यवसायात कार्यरत असलेल्या रवींद्र वाघ यांनी स्वतःची जागा व उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून हा नवीन उद्योग सुरू केला आहे.

ए

सध्या त्यांच्या उद्योगामध्ये गुलाब, मोगरा, लवेंडर, पायनापल यांसह १२ विविध सुगंधांमध्ये अगरबत्ती उपलब्ध असून होलसेल व रिटेल विक्री सुरू आहे. कमी कालावधीत गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले आहे.

झ

या उद्योगाला भेट देऊन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष व भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुका अध्यक्ष मुकुंद मामा काळे, दिनेश नाना बोरनारे व सौ. छायाताई मुकुंद मामा काळे यांनी शाल, श्रीफल व पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ‘आर आर प्रीमियम अगरबत्ती’ उत्पादनांची खरेदी करावी ☎️ *संपर्क : 9922876107

या नव्या उद्योग उपक्रमाबद्दल कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र परजणे साहेब, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. बाळासाहेब शेटे साहेब, ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश भाऊ परभणे, श्री. रामभाऊ कासार साहेब, श्री. संभाजी बोरनारे साहेब, भाजपा सचिव संदीप भाऊ मैंद, सचिन भाऊ शेटे, श्री. राजेंद्र आबा बोरनारे, दिलीपराव कासार व मोहन निकम साहेब यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!