मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल
दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी
अंदरसुल -आज दिनांक १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इ दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन नुकताच जाहीर झाला त्यात मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय अंदरसुलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली लिंगायत वैष्णवी जगदीश या विद्यार्थीनीने ४५६ गुण मिळवत ९१.२०% मार्क्स मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला तसेच ढोले वैष्णवी नवनाथ ४५२गुण मिळवत ९०.४०% टक्के मिळवुन व्दितीय क्रमांक मिळविला गुंजाळ अक्षदा संदिप ४४६ गुण मिळवत ९०.२०% टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला सोनवणे श्रध्दा शिवाजी ४३८ गुण मिळवत ८८.२०% टक्के मिळवून चतुर्थी क्रमांक मिळविला धनगे ऋतुजा वाल्मिकी ४३३ गुण मिळवत ८७.२०% टक्के मिळवून पंचम क्रमांक मिळविला.





या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे , उपाध्यक्ष सुदाम सोनवणे ,सरचिटणीस अमोल सोनवणे ,खजिनदार मकरंद सोनवणे संचालक राजेंद्र गायकवाड ,जीवन गाडे , डॉ.भागिनाथ जाधव, राजेंद्र सोनवणे ,उज्वल जाधव ,संगीता सोनवणे ,जनार्दन जानराव ,आकाश सोनवणे तसेच माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ विनिता ताई सोनवणे मुख्याध्यापक अल्ताफ खान प्राचार्य, डॉक्टर सुवर्णा म्हस्के ,मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्य सचिन सोनवणे व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी खूप खूप अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
