आपला जिल्हा

सदगुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा

संपादक मनिष जाधव 9823752964

महाराज

सदगुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सवशिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –
जगातील एकमेव असलेल्या कोपरगाव येथील बेट भागातील दैत्यगुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सदगुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली.

छ

 

अ

यावेळी प.पू. १०८ राघवेश्वरानंदगिरी महाराज, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी सदगुरु श्री शुक्राचार्य महाराजांचे व पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. अनेक  संत, महंतांसह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केले.

क

दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहराजवळील बेट भागात दैत्यांचे गुरू व संजीवनी मंत्राचे निर्माते श्री शुक्राचार्य महाराज यांचे मंदिर आहे. हे जगातील एकमेव मंदिर असून, प्रति त्र्यंबकेश्‍वर म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. या परिसराला मोठा धार्मिक वारसा लाभलेला आहे. सदगुरू शुक्राचार्य मंदिरात कोणतेही शुभ कार्य किंवा विवाह करण्यास कोणताही मुहूर्त, वेळ व नक्षत्र लागत नाही. बाराही महिने या मंदिरात शुभकार्य व विवाह सोहळे संपन्न होतात. त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
ओ
Oplus_131072
सदगुरु शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव, शिव-पार्वती विवाह सोहळा व पालखी मिरवणुकीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.याप्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, दिपक वाजे, स्वप्नील निखाडे यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी, खजिनदार गजानन को-हाळकर, सदस्य लक्ष्मीकांत कुलकर्णी, हेमंत पटवर्धन तसेच स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे सदस्य संजय वडांगळे, चांगदेव आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब लाकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजय रोहम, आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, अरुण जोशी, दिलीप सांगळे, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, विशाल राऊत, व्यवस्थापक राजाराम पावरा आदि मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!