आ.काळेंच्या कार्यकर्त्यांचा कोण लोखंडे ओळख करून द्या असा थेट सवाल
काल 2 मे रोजी कोपरगाव येथे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी थेट कोण लोखंडे आहेत त्यांची ओळख तरी करून द्या असा सवाल केल्याने एकच वातावरण तंग झाले होते.मेहमूद सय्यद यांना तुला वाकचौरेनी पाठवले का ? असे लोखंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता त्यांनी आमदार काळेनी मला इथे बोलवले म्हणून आलो असे उत्तर दिले.याच बैठकीत आमदार काळे यांनी कोल्हे यांना काही लोक दिसत नाही असा टोमणा मारला व आम्ही पाठीत वार करणारे नाही असे वक्तव्य केले.
मात्र काळे यांचे पाठीत वार न करण्याचे वक्तव्य हे काही मिनिटात खोटे ठरले आहे कारण लोखंडे यांची ओळखच नसल्याचे बोलणारे कार्यकर्ते काळेचे असल्याचे उघड झाल्याने नक्की काय चाललय असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

आमदार काळे हे केवळ बातमी आणि बैठका येवढ्या पुरते बोलत आहे मात्र प्रत्यक्षात काळे यांनी देखील कोणताही प्रचार महायुतीचा सुरू केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचा नामुल्लेख करने टाळले असल्याने नक्की काळे बोलता एक आणि वागता एक आहेत का अशी जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.