आपला जिल्हा

12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना जयंतीनिमित्त अभिवादन

संपादक मनीष जाधव ९८२३७५२९६४

12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना जयंतीनिमित्त अभिवादन

संगमनेर तालुक्यात गावोगावी प्रेरणा दिन साजरा होणार

थोरात यांना जयंतीनिमित्त अभिवादन
संगमनेर ( प्रतिनिधी ) थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असून यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. तसेच अमृत उद्योग समूहाच्या वतीने गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिरातील प्रांगणाजवळ प्रेरणास्थळ येथे अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती बाजीराव पाटील खेमनर व कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बाबा ओहोळ म्हणाले की, स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. आर्थिक शिस्त, काटकसर,पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारात राबवून संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरणारे संगमनेर हे आदर्श सहकाराचे मॉडेल निर्माण केले आहे. दरवर्षी 12 जानेवारी हा  दिवस संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. दरवर्षी जयंती महोत्सव व प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब स्मृती पुरस्कार देऊन राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येते.याचबरोबर दिग्गज कलाकारांच्या उपस्थित मध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम येत्या काही दिवसात होणार असून 12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अमृत उद्योग समूहाच्या वतीने प्रेरणास्थळ अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात,आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर ॲड. माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, सुधाकर जोशी, शंकरराव पा.खेमनर, हौशीराम सोनवणे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे,राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, लक्ष्मणराव कुटे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, सौ.सुनंदाताई जोर्वेकर, सौ.मीराताई शेटे,सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सौ.अर्चनाताई बालोडे, सुरेश झावरे,हिरालाल पगडाल, उद्योगपती राजेश मालपाणी यांसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी विकास मंडळ व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!