Uncategorized

कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे शासकीय वाळू डेपो सुरू होणार

संपादक मनिष जाधव 9823752964

कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे शासकीय वाळू डेपो सुरू होणार

महसूलमंत्र्यांच्या हस्ते पुढील आठवड्यात उद्घाटन

कोपरगाव प्रतिनिधी दि.२३ जून २०२३ -कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे पुढील आठवड्यात वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो सुरू करण्यात येणार आहेत. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या वाळू डेपोंचे उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी केले आहे.

ढ

ना

शासकीय वाळू धोरणानुसार हे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात येणार आहेत. या डेपोतून प्रत्येकाला ६०० रूपये ब्रास दराने वाळू उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना , रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकूल धारकांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवीन वाळू धोरणानुसार सुरू होणाऱ्या या वाळू डेपोमुळे अवैध वाळू उत्खन्न व वाहतूकीवर आपोआपच बंदी येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक शासकीय वाळू डेपोमधून स्वस्तात वाळू खरेदी करणार आहेत.असे ही श्री.भोसले यांनी सांगितले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!