आपला जिल्हा

सोमैया महाविद्यालयात संत कबीर जयंती साजरी

मनिष जाधव 9823752964

सोमैया महाविद्यालयात संत कबीर जयंती साजरी

कोपरगाव प्रतिनिधी – आपला भारत देश संतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे. या भूमीमध्ये संत नामदेव,  संत कबीर, संत रविदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी अनेक महान संत होऊन गेले. आधुनिक काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आदी महापुरुषांनी समाज सुधारणेचे कार्य केले. या दीर्घ परंपरेत संत कबीरांचे जीवन आणि कार्य आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अत्यंत प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण आहे. सर्व धर्म समभाव आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी संत कबीरांनी केलेले कार्य आणि त्यांचे काव्य विद्यार्थ्यांनी अभ्यासावे”, असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले. येथील के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभागाच्या वतीने आयोजित ‘संत कबीर जयंती” निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ई

संत कबीरांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी ‘संत कबीरांचे जीवन आणि कार्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी कबीरांचे महत्वपूर्ण आणि लोकप्रचलित दोह्यांची उदाहरणे देत संत कबीरांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी कबीरांच्या निवडक दोह्ंयाचे गायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी केले तर प्रा. किरण सोळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!